महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

World Kidney Day: जागतिक मूत्रपिंड दिन आज होतोय साजरा, जाणून घ्या कसं राहायचं निरोगी - kidney day 2024

World Kidney Day 2024 : जागतिक किडनी ( मूत्रपिंड) दिवस आ 14 मार्च रोजी साजरा केला जात आहे. या दिवशी किडनीशी संबंधित आजार आणि त्यावर योग्य उपचार याबाबत लोकांमध्ये जनजागृती केली जाते.

World Kidney Day 2024
जागतिक किडनी दिन 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 13, 2024, 5:31 PM IST

Updated : Mar 14, 2024, 9:08 AM IST

मुंबई - World Kidney Day 2024 : किडनी हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे, जो रक्तातील विषारी पदार्थ फिल्टर करून मूत्राद्वारे बाहेर काढण्याचे काम करत असतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मानवी शरीरात उपस्थित असलेल्या दोन्ही मूत्रपिंड मिळून 24 तासात सुमारे 200 लिटर द्रव फिल्टर करतात. जर ते योग्य प्रकारे झाले नाही तर शरीरातील डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया विस्कळीत होते. यानंतर अनेक रोग व्यक्तीला घेरतात. यामुळेच शरीराच्या या महत्त्वाच्या अवयवाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशानं दरवर्षी जागतिक किडनी दिन साजरा केला जातो. हा खास दिवस दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जात असतो. म्हणजेच यंदा आज जागतिक किडनी दिन साजरा केला जाणार आहे. आता जागतिक किडनी दिनाचा इतिहास आणि यावेळची थीम जाणून घेऊया.

जागतिक किडनी दिवस : मिळालेल्या माहितीनुसार, 2006 मध्ये पहिल्यांदा जागतिक किडनी दिन साजरा करण्यात आला. दरम्यान त्यावेळी इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजी (ISN) आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ किडनी फाउंडेशन (IFKF) यांनी जागतिक किडनी दिन साजरा करण्याची सुरुवात केली होती. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश किडनीशी संबंधित आजार आणि त्यावर योग्य उपचार याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याचा आहे. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजी आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ किडनी फाउंडेशन दरवर्षी किडनी दिनासाठी एक विशेष थीम ठरवत असतात. यंदाच्या जागतिक किडनी दिनाची थीम ‘सर्वांसाठी किडनीचं आरोग्य’ अशी निश्चित करण्यात आलं आहे.

कसं चांगलं ठेवायचं किडनीचं आरोग्य : आजकाल व्यग्र जीवनात लोकांची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी बिघडल्या आहेत. लोक फास्ट फूड आणि पुरेसे पाणी न पिणे म्हणजेच खाण्यापिण्याच्या सवयी योग्य न ठेवल्यानं अनेक आजार होतात. याशिवाय शरीरात मोठ्या प्रमाणात जमा झालेले विषारी पदार्थ किडनीच्या कार्यावर परिणाम करू लागतात, ज्यामुळे किडनीशी संबंधित आजारांचा धोका वेळोवेळी वाढतो. अशा स्थितीत किडनी निरोगी ठेवण्यासाठी सक्रिय जीवनशैली आणि योग्य खाण्याच्या सवयी असणे अत्यंत आवश्यक आहे. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे किडनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. पाण्याची कमतरता डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेत अडथळा आणू शकते. त्यामुळे किडनीच्या आरोग्यासाठी चांगले ठेवण्यासाठी पाणी योग्य प्रमाणात प्या. उच्च रक्तातील साखरेचा तुमच्या किडनीवरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी किडनीची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. याशिवाय धूम्रपान, दारू आणि तंबाखूचे सेवन टाळा. अशा सवयींचा तुमच्या फुफ्फुसांच्या तसेच किडनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करत असातात. किडनीचे आजार, विशेषत: किडनी स्टोन आणि किडनी निकामी होण्याच्या घटनांमध्ये झपाट्यानं वाढल्या आहे. त्यामुळे नियमितपणे आपल्या शरीराची तपासणी डॉक्टरांकडून केली पाहिजे. जास्त औषध घेणे टाळावे आणि लघवीशी संबंधित कोणतीही सतत समस्या असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.

हेही वाचा :

  1. उन्हाळ्यात त्वचा टॅन झालीय? 'या' सोप्या घरगुती पद्धतींनी काढा चेहऱ्याचं टॅनिंग
  2. राष्ट्रीय फार्मसी दिन : जाणून घ्या भारतातील फार्मसीचे जनक कोण आहेत आणि का साजरा करतात हा दिवस?
  3. जंगलात हिंस्त्र प्राण्यांचा बचाव करणाऱ्या 'वन दुर्गा' प्रेम कंवर शक्तिवत यांची अद्भूत गोष्ट
Last Updated : Mar 14, 2024, 9:08 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details