हैदराबाद World Health Day 2024 :जागतिक आरोग्य दिन हा मलेरिया, एचआयव्ही-एड्स, कर्करोग आणि मानसिक आरोग्य यासारख्या अनेक आरोग्यविषयक समस्यांबद्दल जागरुकता वाढवतो. हा दिवस लोकांना निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्यास प्रेरित करतो. यात नियमित व्यायाम, निरोगी आहार, तंबाखू आणि अल्कोहोलपासून दूर राहणं समाविष्ट आहे. या दिवशी लोकांना त्यांच्या आरोग्याविषयी जागरुक करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम, चर्चासत्रं, आरोग्य तपासणी शिबिरं आणि वेबिनारचं आयोजन केलं जाते.
आजघडीला जगभरातील कोट्यवधी लोकांच्या आरोग्याचा अधिकार धोक्यात येत आहे. रोग आणि संकटं मृत्यू आणि अपंगत्वाची कारणं म्हणून उदयास येतात. संघर्षांमुळे जीवन विध्वंसक बनतं, ज्यामुळं मृत्यू, वेदना, भूक आणि मानसिक त्रास होतो. जीवाश्म इंधनांचं जाळणं एकाच वेळी हवामान संकट वाढवत आहे. स्वच्छ हवेचा श्वास घेण्याचा आपला हक्क हिरावून घेत आहे. घरातील आणि बाहेरील वायू प्रदूषणानं दर 5 सेकंदाला एक जीव घेतलाय.
डब्ल्यूएचओ कौन्सिल ऑफ हेल्थ इकॉनॉमिक्सला आढळून आलंय की, किमान 140 देशांनी त्यांच्या संविधानात आरोग्य हा मानवी हक्क म्हणून उल्लेख केलाय. तरीही अनेक देश कायदे करत नाहीत किंवा त्यांच्या लोकसंख्येला आरोग्य सेवा मिळण्याचा अधिकार आहे. 2021 मध्ये किमान 450 कोटी लोकांवर (जगातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्येच्या) अत्यावश्यक आरोग्य सेवांचा पूर्णपणे अंतर्भाव झालेला नाही हे, यावरुन अधोरेखित होतं. जागतिक आरोग्य दिन 2024 ची थीम 'माझं आरोग्य, माझा हक्क' आरोग्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आहे. दर्जेदार आरोग्य सेवा, शिक्षण आणि माहिती तसंच सुरक्षित पिण्याचं पाणी, शुद्ध हवा, चांगलं पोषण, दर्जेदार घरं, सभ्य काम आणि पर्यावरणीय परिस्थिती आणि स्वातंत्र्य या सर्वांचा हक्क मिळवण्यासाठी या वर्षीची थीम निवडण्यात आलीय.