पिंपरी World Breastfeeding Week 2024 :बालकांसाठी आईचे दूध अत्यंत महत्त्वाचे असते. आईच्या दुधाला पर्याय असू शकत नाही. नुकत्याच जन्मलेल्या बाळांपासून ते सहा-आठ महिन्यापर्यंतच्या बाळांना अनेकदा आईचे दूध मिळू शकत नाही. अशा बाळांना आईचे दूध देणारी 'यशोदा मिल्क बँक' वरदान ठरत आहे. 'जागतिक स्तनपान सप्ताह'च्या निमित्तानं पिंपरी चिंचवड शहरात जनजागृती केली जाते.
जागतिक स्तरावर 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. या 7 दिवसात बाळासाठी उत्तम पोषण आणि संपूर्ण आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी शिशु संगोपनाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. जागतिक पातळीवर बाळाच्या सदृढ विषयांच्या योजना आणि नव जागरूकता करत अनेक मातांना जागरुक केलं जातं. या सप्ताहात बाळाच्या संगोपनासाठी गुणवत्ता धोरणं आखली जातात.
स्तनपान जनजागृती सप्ताह (Source - ETV Bharat) दररोज 8-10 लिटर दूध संकलन : अनेक मातांच्या प्रसूती काळात गुंतागुंतीची स्थिती निर्माण होते. आई आणि बाळ प्रकृती अभावी वेगवेगळ्या रुग्णालयात असतात. तसेच आईला गंभीर आजार असल्यामुळे दूध कमी प्रमाणात येणं, प्रसूतीनंतर थोड्याच दिवसांत दूध येणं बंद किंवा कमी होतं तेव्हा स्तनपान हे बाळापासून वंचित राहते. त्यावेळी बाळाला पुरेसे एवढे आईचे दूध मिळत नाही. अशावेळी खूप चांगल्या संकल्पनेतून पिंपरी चिंचवड शहरामध्ये डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील 'यशोदा मिल्क बँक' प्रेरणादायी काम करताना दिसत आहे. या ठिकाणी त्या बाळांना आपलं दूध दान करून अनेक माता मातृत्वाचं दर्शन घडवित आहेत. दररोज 8 ते 10 लिटर दूध संकलन होत असल्यामुळे अनेक नवजात बालकांना त्याचा उपयोग होताना दिसत आहे. डॉ. भाग्यश्री पाटील, विश्वस्त डॉ. यशराज पाटील यांच्या पुढाकारातून सप्टेंबर 2013 मध्ये 'यशोदा मिल्क बँक' सुरू झाली. मागील दहा वर्षांत या मिल्क बँकेत 50 लाख मिलिलिटर पेक्षा जास्त दूध संकलन झालं आहे.
2013 पासून यशोदा मिल्क बँकचे काम सुरू :'यशोदा मिल्क बँके'च्या बालरोगतज्ञ व आंतरराष्ट्रीय स्तनपान सल्लागार डॉ. शैलेजा माने यांनी माहिती देताना सांगितलं की, "यशोदा मिल्क बँकेची निर्मिती 2013 मध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारीतून तयार करण्यात आली. याचा महत्वाचा उद्देश असा की, सर्व समाजघटकातील मातांना स्तनपानाचे महत्व समजावं. त्यांना बाळंतपणात दुधाभावी अडचणी येतात. त्यावर मात करण्यासाठी आम्ही "यशोदा मिल्क बँके"च्या माध्यमातून मदत करत आहोत. अनेकदा मातांचे नवजात बालक एनआयसीयूमध्ये असतात. कमी वजनाचे किंवा कमी दिवसाचे असतात. त्या बालकांना उत्तम दर्जाचं दूध मिळावी. जेणे करून बालकांवर इतर कोणता परिणाम होणार नाही, यासाठी यशोदा बँकेची निर्मिती झाली आहे."
26 हजार बालकांना हा दुधपुरवठा : "या मिल्क बँकेत अनेक माता स्वतःहून दूध दान करतात. पिंपरी चिंचवड शहराच्या आजूबाजूचे जिल्हे पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक अशा अनेक जिल्हातील एनआयसीयूत असलेल्या बालकांनासुद्धा या मिल्क बँकेतून दूध पुरवलं जातं. दूध पाठवताना बाळाची अवस्था काय आहे? त्याला कोणत्या गुणधर्माचे दूध पचनी जाईल? याचा रिपोर्ट मागवून त्या प्रतीचे दूध पुरवले जाते. आतापर्यंत 26 हजार बालकांना हा दूध पुरवठा केला आहे. या दुधाचा असा फायदा झाला आहे की, या मिल्क बँकेमुळे नवजात बालकांना आजारी पडण्याचा, आतड्याचा त्रास, त्वचा इन्फेक्शन, बाळाची शुगर कमी होणे हा सगळा त्रास कमी झाला. त्याचबरोबर कमी दिवसात जन्म घेतलेल्या बालकांची प्रतिकार शक्ती कमी, पचन शक्ती कमी असते त्यानुसार आईचे दूध हे पचायला हलकं असतं. त्याचबरोबर बालकांना जे प्रोटीन, नुट्रेस, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन लागतात ते या दुधातून सहज मिळतात. नवजात बालकांचा मृत्यू दर 3.2 वर आहे. हा दर इतर देशांपेक्षा कमी असल्याचा रिपोर्ट मिळाला आहे," असंही डॉ. शैलेजा माने यांनी सांगितलं.
- आईनं दूध दान केल्यानं काय फायदे होतात : " जेवढ्या प्रमाणात दूध काढले जाते, त्यापेक्षा जास्त दूध आईच्या स्तनात तयार होत असते. दूध दान करणाऱ्या मातेला स्तन संसर्ग किंवा इतर दुष्परिणाम होत नाहीत. स्तनात दूध अडकल्याने पांढरी कावीळ होण्याची शक्यता कमी होते.
- कसं केलं जातं दूध संकलन : मातृ दुग्ध संकलन वाहनातर्फे निवडक मातेच्या घरी जाऊन दूध संकलन केलं जातं. सुरुवातीस हे दूध जंतूविरहीत केलं जातं. त्यानंतर ते लॅबमध्ये टेस्ट करून उणे 20 अंश सेल्सिअस तापमानात फ्रीजरमध्ये साठवून ठेवलं जातं. हे दूध साधारण 6 महिने ते 1 वर्षापर्यंत ठेवता येते.
हेही वाचा
- जिम करताना कोणती काळजी घ्यावी? तज्ज्ञांनी काय म्हटलं? - EXERCISE SAFETY TIPS
- मान्सूनच्या हंगामात त्वचेला चमकदार बनवण्यासाठी करा 'या' गोष्टी - skincare tips'
- 'या '5 इनडोअर ॲक्टिव्हिटीजसह मुलांबरोबर पावसाळ्यामध्ये करा धमाल - 5 INDOOR ACTIVITIES FOR KIDS