नवी दिल्लीWHICH ROTI IS BEST for Weight Loss: आजकाल वजन कमी करण्याची सर्वात ट्रेंडिंग पद्धत म्हणजे योग्य 'डायटिंग'. अनेकजण वजन कमी किंवा शरीर मेन्टेन ठेवण्यासाठी डायटिंग करतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही लोक आहारातून चपाती वगळतात तर, काही जण भात आणि फ्राइड पदार्थ खाणं टाळतात. मात्र, चपाती खाऊनही वजन मेन्टेन ठेवता येतं हे तुम्हाला माहीत आहे का? (HEALTHY ROTIS FOR WEIGHT LOSS) चला तर याविषयी आपण जाणून घेऊया.
गव्हाच्या चपातीत 70 ते 80 टक्के कॅलरीज :पोषणतज्ञ रुचिताबत्रा यांनी अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी मदत करणाऱ्या काही उत्तम चपात्यांचा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या चपात्यांची माहिती दिलीय. पोषणतज्ञ रुचिताबत्रा यांनी गव्हाच्या ब्रेडचा उल्लेख करून आपल्या व्हिडिओची सुरुवात केली. तसंच एका गव्हाच्या चपातीमध्ये सुमारे 70 ते 80 टक्के कॅलरीज असतात. यामध्ये व्हिटॅमिन बी आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात, असं त्या म्हणाल्या.
नाचणीच्या भाकरीचे फायदे : नाचणीच्या भाकरीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. यामध्ये सुमारे 80 ते 90 कॅलरीज असतात. तर नाचणीमध्ये कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. हाडांच्या आरोग्यासाठी पोषण आवश्यक असलेल्या लोकांसाठी ही भाकरी सर्वोत्तम पर्याय आहे.