हैदराबाद Which Oil is Best for Cooking: बाजारात विविध प्रकारचं तेल उपलब्ध आहेत. प्रत्येक जण जेवण तयार करण्यासाठी आपल्या आवडीनुसार तेल वापरतात. कुणी प्रत्येक महिण्याला वेगवेगळे तेल वापरतात, तर कुणी तीन महिण्यानंतर तेल बदलतात. साधारणतः प्रत्येक स्वयंपाकघारात रिफाइंड तेल, सूर्यफूल तेल, भूईमुग, तांदळाचं तेल वापलं जाते. परंतु सध्या 'कोल्ड प्रेस' ऑइल म्हणजेच कच्च्या घाणीच्या तेलाला विशेष मागणी आहे. कच्च्या घाणीच्या तेलाचे अनेक आरोग्यदायी फायदे दिसून आले आहेत. कच्च्या घाणीचं तेल कमी तापमाणात काढलं जातं. यामुळे तेलांच रंग, चव, सुगंध आणि पोषक घटक टिकून राहतात, अशी माहिती प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ डॉ. लहरी सुरपाणेंनी दिली आहे.
कोणतं तेल घ्यावं?
''उच्च स्मोकिंग पॉइंट असलेल्या तेलाची निवड स्वयंपाकासाठी करावी. हे तेल थोडं महाग असले तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. डीप फ्राईंगसाठी ॲव्होकॅडो तेल हा उत्तम पर्याय आहे.ते उपलब्ध नसल्यास सूर्यफूल किंवा सोयाबीन तेल डीप फ्राईंगसाठी वापरता येतं. रोजच्या स्वयंपाकासाठी तिळ किंवा राईस ब्रॅन ऑइलचा वापर कोल्ड टॉपिंगमध्ये करावा. एक्स्ट्रा व्हर्जिन ऑइल, फ्लेक्स सीड ऑइल, मोनो सॅच्युरेटेड, पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स हृदयासाठी खूप चांगले असतात, साट्युरेटेड तेल खाल्ले तर तुमच्या शरीरात ओमेगा 6 फॅटी ऍसिड जास्त प्रमाणात तयार होते. - डॉ.लहरी सूरपणेंनी, पोषणतज्ञ''
बदामाचं तेल: बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. ते ओमेगा ३ फॅटी ॲसिडमध्ये समृद्ध असतं आणि त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले असतं.
ऑलिव्ह ऑईल:ऑलिव्ह ऑईल हे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे आणि त्याचा वापर स्वयंपाकात केल्यानं मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजारांवर नियंत्रण ठेवता येतं. असं म्हटलं जातं की ते कर्करोग आणि मधुमेहाच्या आजारांवर औषध म्हणून काम करतं.
ॲव्होकॅडो तेल:ॲव्होकॅडो तेलात मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते. यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं असल्याचं डॉक्टर सांगतात.