महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

सकाळी अंथरुणातून उठताच या '6' गोष्टी अवश्य करा, बर्फासारखं वितळेल कोलेस्ट्रॉल

कोलेस्ट्रॉल ही एक मोठी समस्या आहे. मोठ्या संख्येने लोक कोलेस्ट्रॉलच्या समस्यांशी झूंज देत आहेत. परंतु सकाळी उठल्यावर काही पदार्थ खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल वितळू शकते.

FOODS THAT LOWER CHOLESTEROL
कोलेस्ट्रॉल (ETV Bharat)

By ETV Bharat Health Team

Published : Nov 11, 2024, 7:10 PM IST

Updated : Nov 11, 2024, 7:16 PM IST

FOODS THAT LOWER CHOLESTEROL: शरीरात खराब कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढणे ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. ही समस्या जगभरातील जवळपास सर्वच वयोगटातील लोकांना अधिकाधिक प्रभावित करत आहे. यासाठी जीवनशैलीचा भाग मानला जाणारा आहार आणि व्यायामासह अनुशासित आणि असंतुलित सवयींना जबाबदार धरले जात आहे.

या आजाराला सायलेंट किलर का म्हणतात?

उच्च कोलेस्टेरॉल हा सायलेंट किलर आजार ठरत आहे. कोलेस्टेरॉलमुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो. म्हणूनच, वैद्यकीय तज्ञ उच्च कोलेस्टेरॉलने ग्रस्त असलेल्या लोकांना जीवनशैलीत बदल करण्यासाठी आणि नैसर्गिकरित्या खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करण्यास सक्षम असलेले योग्य अन्न निवडण्याचा सल्ला देतात.

  • कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी 'या' गोष्टी खा
  • अक्रोड: अक्रोडामध्ये भरपूर पोषक घटक असतात. जर तुम्ही दररोज नाश्त्यात काही अक्रोड खाल्ले तर ते उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो, असं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
  • बदाम: बदाम चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतात आणि खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते. हेल्थ हार्वर्ड एज्युकेशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात आणि इतर अनेक अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, सकाळी बदाम खाल्ल्यास खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे ते सकाळी खाणं चांगलं आहे.
  • ऑलिव्ह ऑईल: ऑलिव्ह ऑईल हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. या तेलाने बनवलेले अन्न आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या तेलामुळे चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते, असं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
  • फ्लेक्ससीड्स:अनेक पोषक तत्वांसह, फ्लेक्ससीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स भरपूर असतात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, फ्लॅक्ससीड पावडर 3 महिने सतत सकाळी घेतल्यास खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते.
  • मॉर्निंग वॉक, व्यायाम किंवा योगा: मॉर्निंग वॉक किंवा व्यायामामुळे रक्तातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. एरोबिक व्यायामामुळे रक्तातील चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. याशिवाय योगामुळे आपल्या आरोग्याचे संरक्षण होते.
  • संत्र्याचा रस:सकाळी एक ग्लास व्हिटॅमिन सी युक्त संत्र्याचा रस प्यायल्यानं कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते, असं राष्ट्रीय आरोग्य सेवा आणि वैद्यकीयतज्ज्ञांचं म्हणणं आहे. संत्र्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात जे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात.
Last Updated : Nov 11, 2024, 7:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details