महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

मधुमेह ग्रस्तांसाठी 'ही' फळं आहेत सर्वाधिक फायदेशीर - DIABETES HEALTH CARE TIPS

मधुमेह असलेल्या प्रत्येकाला हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. तर, आहारतज्ञ जयश्री बनिक यांच्या मते, मधुमेहींसाठी कोणती फळे फायदेशीर आहेत, ते जाणून घ्या.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Health Team

Published : Feb 15, 2025, 3:41 PM IST

Updated : Feb 15, 2025, 4:02 PM IST

Diabetes Health Care Tips: 'मधुमेह' हा सायलेंट किलर आजार असून त्यावर प्रतिबंधक असा कोणताही इलाज नाही. एकदा हा आजार झाला की, यावर नियंत्रण ठेवूनच निरोगी जीवन जगता येवू शकते. याकरिता संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि औषधोपचार हेच पर्याय आहेत. आहारतज्ञ जयश्री बाणिक यांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहाराची विशेष काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू नये, म्हणून मधुमेह ग्रस्तांनी काही फाळांचा समावेश आहारात करावा. जाणून घ्या मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असलेली फळे.

हिरवे फळं (Freepik)
  • मधुमेहासाठी ही हिरवी फळे फायदेशीर
  • पेरू: पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. फायबर रक्तातील साखर हळूहळू शोषण्यास मदत करते. ज्यामुळे शरीरातील साखरेच्या पातळीत अचानक होणारे चढ-उतार रोखते. तसंच, पेरूमध्ये असलेले 'व्हिटॅमिन सी' रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते.
पेरू (Freepik)
  • मोसंबी: मोसंबीमध्ये 'व्हिटॅमिन सी' तसेच फोलेट आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते. फोलेट शरीराला नवीन पेशी बनवण्यास मदत करते. दुसरीकडे, पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. गोड मोसंबीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. याचा अर्थ की मोसंबी साखरेची पातळी लवकर वाढवत नाही.
मोसंबी (Freepik)
  • नाशपाती:नाशपातीमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते. फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. तसंच व्हिटॅमिन के हाडे मजबूत करण्यास मदत करते. इतकेच नाही तर नाशपातीमध्ये असलेले पेक्टिन हे एक विरघळणारे फायबर आहे, जे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास देखील मदत करते.
नाशपाती (Freepik)
  • किवी: किवीमध्ये फायबर आणि पोटॅशियमसह व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के असते. किवीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या पेशींच्या नुकसानापासून संरक्षण करतात. किवीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे तो मधुमेहींसाठी एक चांगला पर्याय बनतो.
  • हिरवे सफरचंद: हिरव्या सफरचंदांमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. तसंच व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे. त्याचबरोबर हिरव्या सफरचंदांमध्ये असलेले पेक्टिन शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास देखील मदत करते.
  • टरबूज: टरबूजमध्ये व्हिटॅमिन बी६ भरपूर प्रमाणात असते. जे सेरोटोनिनच्या उत्पादनासाठी आवश्यक आहे. सेरोटोनिन हा एक न्यूरोट्रांसमीटर आहे, जो शरीरातील हॅपी हारर्मोन्स उत्प्रेरित करतो. यामुळे मूड सुधारण्यास मदत होते. हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

Last Updated : Feb 15, 2025, 4:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details