महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

किडनीच्या आजारानं त्रस्त आहात? नियमित खा 'ही' फळं किडनी राहील निरोगी - Kidney Detox These 5 Fruits - KIDNEY DETOX THESE 5 FRUITS

Kidney Detox These 5 Fruits : किडनी निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला रुग्णालयाच्या चकरा वाचवायच्या असतील तर, आहारात काही फळांचा समावेश केल्यानं रुग्णालयात न जाता किडनी निरोगी ठेवू शकता. चला तर जाणून घेऊया किडनीचं आरोग्य सुधारण्यासाठी डॉक्टर कोणती फळं सेवन करण्यास सांगतात.

Kidney Detox These 5 Fruits
किडनीच्या आजारानं त्रस्त आहात? (ETV Bharat)

By ETV Bharat Health Team

Published : Sep 10, 2024, 5:17 PM IST

हैदराबाद Kidney Detox These 5 Fruits : आपल्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी किडनी एक आहे. शरीरातील हानीकारक टॉक्सिन्स बाहेर काढण्याचं काम किडनी करते. मात्र अलिकडच्या काळात अनेकांना विविध कारणांमुळे किडनीचा त्रास होत आहे. किडनीवर काही परिणाम झाल्यास मानसाला अनेक रोग जडू लागतात. यामुळे किडनी निरोगी ठेवणं खूप गरजेचं आहे. परंतु किडनीचं कार्य सुरळीत चालण्यासाठी शरीर डिटॉक्स होणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे नियमित तुम्ही काही फळांचं सेवन केल्यास किडनी निरोगी राहण्यास मदत होवू शकते.

बेरी, सफरचंद आणि लिंबू यांसारखी ताजी फळं खाल्ल्यानं किडनी निरोगी राहते,असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. सन 2020 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबेटिस अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीजेस (NIDDK) मध्ये प्रकाशित झालेल्या इटिंग राइट फॉर किडनी हेल्थ(अहवाल) अभ्यासात हे उघड झालं आहे. डॉ. अँड्र्यू एस. नार्वा यांनी हा अभ्यास केला आहे.

क्रॅनबेरी:क्रॅनबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, प्रोअँथोसायनिडन भरपूर असतात, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. किडनीच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी या गोष्टींची मदत होत असल्याचं समोर आलं आहे. क्रॅनबेरीच्या सेवनामुळे मूत्रपिंडाच्या पेशींमध्ये जळजळ होण्याचा धोका कमी होतो. किडनी डिटॉक्सकरण्यासाठी ही फळं उपयुक्त आहेत.

लिंबू: लिंबूमध्ये व्हिटॅमीन सी भरपूर प्रमाणात असतं. यामुळे किडनी स्टोन विरघळण्यास मदत होते. त्याशिवाय नियमित सेवन केल्यास मूत्रमार्गाचं आरोग्य सुधारतं. तसंच किडनी निरोगी आणि मजबूत ठेण्यासाठी लिंबू फायदेशीर आहेत.

टरबूज:टरबूजामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे. ते डिटॉक्सिफायिंग गुणधर्मांनी समृद्ध आहे. असं म्हटलं जाते की, टरबूज केवळ विषारी पदार्थ बाहेर काढत नाही, तर मूत्रपिंड हायड्रेटेड ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावते.

सफरचंद: सफरचंदांमध्ये भरपूर फायबर आणि अँटीऑक्सिडंट असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. अँटिऑक्सिडंट्स जळजळ कमी करतात, डिटॉक्सिफिकेशनला प्रोत्साहन देतात आणि मूत्रपिंडाचे कार्य सुधारतं.

डाळिंब: डाळिंब हे आणखी एक फळ आहे जे किडनी निरोगी ठेवतं. त्यात दाहक-विरोधी गुणधर्म असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. यामुळे मूत्रपिंड शुद्ध करण्यासाठी तसंच त्यांचे कार्य सुधारण्यास मदत करतात.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

किडनीच्या आरोग्याकडं 'या' टिप्स फॉलो करून द्या लक्ष, अन्यथा गंभीर होऊ शकतात आजार - keep Your Kidney fit

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच शरीरात दिसतात ‘ही' सात लक्षणं; दुर्लक्ष केल्यास पडेल महागात - Symptoms Before A Heart Attack

ABOUT THE AUTHOR

...view details