Walking 20000 Steps a Day Benefits:निरोगी राहण्यासाठी तज्ञ नियमित चालण्याचा सल्ला देतात. कारण नियमित चालल्यास आरोग्यविषयक अनेक फायदे होतात. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं की, दिवसातून किमान 20,000 पावलं चालली पाहिजे. यामुळे वजन तर कमी होतोच शिवाय झोपही चांगली येते. त्याचबरोबर इतर समस्या ही दूर होतात.
युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी अभ्यासानुसार, नियमित चालल्यास हृदयासंबंधित आजारांचा धोका कमी होतो. तसंच एकाग्रता वाढवण्यासाठी देखील चालणं फार महत्त्वाच आहे. पोलंडमधील लॉड्झ मेडिकल युनिव्हर्सिटीचे प्रा. मॅसीज बानाच यांनी हा अभ्यास केला. या अभ्यासात असं आढळून आलं की, नियमित 20,000 पावलं चालल्यास आरोग्यदायी अनेक फायदे आहेत.
- हृदयाचं आरोग्य:हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी चालण्यासोबतच, एरोबिक व्यायाम सर्वोत्तम आहे. हे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते. तंज्ञांच्या मते, दररोज चालल्यामुळे उच्च रक्तदाब कमी होतो तसंच आणि रक्तपुरवठा सुधारते.
- वजन कमी करणे: 20,000 पावलं चालल्यानं 500 ते 1000 कॅलरीज बर्न होऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी आणि नियंत्रणासाठी चालणे खूप उपयुक्त आहे. चालण्याचा वेग, क्षेत्रफळ आणि अंतरानुसार कॅलरी बर्न होण्यात फरक असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आलं आहे.
- शुगर लेव्हल मॅनेजमेंट: चालण्यासारख्या नियमित व्यायामामुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते, असं संशोधकांनी स्पष्ट केलं आहे. हे टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी करते. संशोधकांनी स्पष्ट केलं की, जेवल्यानंतर थोडं चालल्यास ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहू शकते.
- एकाग्रता वाढवते:चालण्यानं एंडोर्फिन हार्मोन्स बाहेर पडतात जे तणाव आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. नियमित चालल्यास तणाव कमी होऊन कामावरील एकाग्रता वाढू शकते, असं तंज्ञांचं म्हणणं आहे.
- काय खबरदारी घ्यावी?:
- तज्ञांच्या मते, लांब अंतर चालल्यामुळे काही लोकांना क्रॅम्प होऊ शकतात. यासाठी योग्य विश्रांती आणि पौष्टिक आहार आवश्यक आहे.
- चालताना हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे.
- तीव्र वेदना आणि हृदयाच्या समस्या असलेल्या लोकांनी चालताना सावधगिरी बाळगली पाहिजे. एका वेळी 20,000 पावले चालण्याऐवजी, आपण कमी चालण्यापासून सुरू केले पाहिजे. दिवसातून 10 पावलं चालणं सुरू करा. तसंच हळूहळू हे वाढवून 20 हजार पावलं चालण्यावर लक्ष केंद्रित करा.