महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

रोजच्या वापरातील हे घटक आहेत घातक! किडनी होऊ शकते निकामी - HOW TO AVOID KIDNEY PROBLEMS

रोजच्या उपयोगात असलेले काही घटक मुत्रपिंड निकामी करू शकतात. ज्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. ते घटक कोणते? वाचा सविस्तर.

HOW TO AVOID KIDNEY PROBLEMS  Preventing Kidney Disorders  Kidney Failure Causes And Symptoms
किडनी खराब होण्याची लक्षणं (Freepik))

By ETV Bharat Health Team

Published : Feb 21, 2025, 11:46 AM IST

Updated : Feb 21, 2025, 12:37 PM IST

How To Avoid Kidney Problems:मूत्रपिंड हे आपल्या शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. मूत्रपिंड रक्तातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करते तसंच मूत्राद्वारे ते बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे कार्य करते. मूत्रपिंड न थांबता 24 तास काम करत असते. मात्र, अलिकडच्या काळात, अनेक लोक विविध कारणांमुळे मूत्रपिंडाशी संबंधित समस्यांनी ग्रस्त आहेत. अनेकांना असे वाटते की याचे कारण खराब आहार आणि उच्च रक्तदाब आहे. परंतु, तज्ञांचे म्हणणे आहे की आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या काही गोष्टी आपल्या मूत्रपिंडांना नुकसान पोहोचवू शकतात. चला जाणून घेऊया त्या वस्तू कोणत्या?

किडनी खराब होण्याची लक्षणं (Getty Images)
  • फेअरनेस क्रीम्स:तज्ञांचं म्हणणं आहे की, बरेच लोक वापरत असलेल्या फेअरनेस क्रीम्समुळे किडनी खराब होऊ शकते. त्यात हानिकारक पारा जास्त प्रमाणात असल्याचे उघड झालं आहे. जो मेलेनिन उत्पादन रोखण्यासाठी वापरला जातो. हा घटक त्वचेद्वारे शोषला गेल्यास शरीरात सहज प्रवेश करू शकतो परिणामी मूत्रपिंडांना नुकसान होवू शकते. पारा असलेल्या सौंदर्यप्रसाधनांचा दीर्घकाळ वापर केल्याने मूत्रपिंड निकामी होऊ शकते, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. म्हणूनच अशी उत्पादने खरेदी करण्यापूर्वी त्यातील घटक तपासण्याची आणि आवश्यक असल्यास त्वचारोगतज्ञांचा सल्ला घेण्याची शिफारस केली जाते.
किडनी खराब होण्याची लक्षणं (Getty Images)
  • हर्बल सप्लिमेंट्स: बरेच लोक हर्बल सप्लिमेंट्सना फार्मास्युटिकल औषधांचा पर्याय म्हणून अवलंब करतात. मात्र, तज्ञांचे म्हणणे आहे की जरी ते नैसर्गिक किंवा हर्बल म्हणत असले तरी, काही उत्पादनांमध्ये चुकीच्या चाचणीमुळे हानिकारक रसायने असू शकतात. यामध्ये आर्सेनिक, शिसे आणि पारा यांसारखे विषारी पदार्थ वापरल्याने ते शरीरात जमा झाल्यास मूत्रपिंडांना नुकसान होऊ शकते. म्हणूनच हर्बल उत्पादनं वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि प्रतिष्ठित ब्रँडची उत्पादने वापरण्याची शिफारस केली जाते.
किडनी खराब होण्याची लक्षणं (Getty Images)
किडनी खराब होण्याची लक्षणं (Getty Images)
  • ग्रीन टी:जगातील सर्वात आरोग्यदायी पेयांमध्ये ग्रीन टीचे विशेष स्थान आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की त्यातील अँटीऑक्सिडंट्सचे अनेक आरोग्य फायदे आहेत. परंतु, तुम्हाला माहित आहे का की जास्त प्रमाणात ग्रीन टी (दररोज अर्ध्या लिटरपेक्षा जास्त) पिल्याने मूत्रपिंड निकामी होऊ शकते? त्यात असलेले ऑक्सलेट्स कॅल्शियमसोबत एकत्र येऊन किडनी स्टोन तयार करतात हे उघड झालं आहे. असं असलं तरी, ग्रीन टी पिणे पूर्णपणे थांबवण्याची गरज नाही, परंतु तुम्ही ते जास्त प्रमाणात घेऊ नये अशी शिफारस केली जाते. जर तुम्हाला आधीच किडनी स्टोन असेल तर कमी डोसमध्ये पिण्याचा सल्ला दिला जातो.
  • प्रथिने पूरक आहार: कुपोषणामुळे, विशेषतः जिममध्ये जाणाऱ्यांमध्ये, त्यांच्या व्यायामाचा भाग म्हणून प्रथिने पूरक आहार घेतात. स्नायू वाढवण्यासाठी बरेच लोक पावडर आणि शेक घेतात. मात्र, तज्ञांचं म्हणणं आहे की, याच्या जास्त सेवनामुळे मूत्रपिंडांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. आपण वापरत असलेल्या प्रथिनांना फिल्टर करण्यासाठी मूत्रपिंड जबाबदार असतात. जास्त प्रथिने सेवन केल्याने मूत्रपिंडांवर दबाव वाढून समस्या निर्माण होऊ शकते. ज्यामुळे ते फिल्टर होऊ शकत नाहीत. म्हणूनच हे जास्त प्रमाणात न घेता योग्य डोसमध्ये घेण्याची आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याची शिफारस केली जाते.
किडनी खराब होण्याची लक्षणं (Getty Images)
  • केस स्ट्रेट करणारी उत्पादने: काही लोक वारंवार केस स्ट्रेट करतात. यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या काही उत्पादनांचा वापर केला जातो. मात्र, त्यात असलेले ग्लायकोलिक अॅसिड त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करते आणि मूत्रपिंडांना नुकसान पोहोचवते हे उघड झाले आहे.
Last Updated : Feb 21, 2025, 12:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details