BEST PLACES IN MAHARASHTRA : नवीन वर्ष सुरू व्हायला अवघा एक महिना बाकी आहे. नवीन वर्षात अनेक जणांचा बाहेर फिरायला जाण्याचा प्लॉन असतो. तुम्ही देखील आपल्या जीवनसाथीसोबत एकटं वेळ घालवण्याचा विचार करत आहात काय? महाराष्ट्रातील असे काही ठिकाणं आहेत. जे नैसर्गिक साधनसंपत्तीनं समृद्ध आहेत. हे ठिकाणं नेहमी पर्यटकांना आकर्षित करतात. चला तर पाहूया महाराष्ट्रातील रोमॅंटिक पर्यटन ठिकाणं.
महाबळेश्वर : सातारा जिह्यातील महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण आहे. हे शहर मुंबई पासून 228 कि. मी. अंतरावर आहे. धबधबे, संदुर दऱ्या, निर्मळ तलावांकरिता महाबळेश्वर ओळखलं जातं. नवीन जोडप्यांसाठी हे एक रोमॅंटि स्पॅाट असून एकदा तरी भेट देण्यासारखं आहे. येथील नयनरम्य ठिकाणं आणि वातावरण मन मोहून टाकणारं आहे. याला महाराष्ट्राचं नंदनवन तसंच डोंगराची राणी म्हणून देखील ओळखलं जातं. येथील खास ठिकाणं म्हणजे, विल्सन पॉइंट, लीग्नमाला धबधबा, एलीफंट पॉइंट, वेण्णा लेक, पंचगगा मंदिर, आर्थर सीट पॉइंट, कृष्णाबाई मंदिर आदी आहेत. महाबळेश्वर निसर्गाच्या कुशीत असल्यामुळे येथे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी अनेक कुटुंब येतात.
लोणावळा:रोमॅंटिक गेटवे तसंच आरामदायक रिसॉपर्ट शोधणाऱ्या जोडप्यांसाठी लोणावळा लोकप्रिय ठिकाणांपैकी आहे. येथील घनदाट जंगल, नयनरम्य निसर्ग, टेकड्या, किल्ले, मंत्रमुग्ध करणाऱ्या धबधबांनी वेढलेला लोणावळा आल्हाददायक आहे. लोणावळ्यावरून पाच किलोमीटर अंतरावर खंडाळा हे थंड हेवेचे ठिकाण आहे. तसंच लोणावळ्याजवळील कार्ला टेकड्यांमधील डयूक्स नोज पॉइंट ट्रॅकिंगसाठी उत्तम आहे.