टोकियो Syphilis Case Rising in japan:कोरोनानंतर सिफलिस नावाच्या नव्या आजारानं युरोपातील अनेक देशांमध्ये धूमाकुळ घातला आहे. टोकियोमध्ये सिफिलीसची प्रकरणं झपाट्यानं समोर येत आहेत. आतापर्यंत 2400 हून अधिक रुग्ण समोर आल्याचं अधिकृत आकडेवारीवरून दिसून आलं आहे. वृत्तसंस्था शिन्हुआच्या मते, टोकियो मेट्रोपॉलिटन इन्फेक्शियस डिसीज सर्व्हिलन्स सेंटरच्या आकडेवारीनुसार राजधानीत सुमारे 2,460 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तज्ज्ञांच्या मते सिफिलीसची प्रकरणं वेगानं वाढत आहेत. गेल्या वर्षी 3,701 प्रकरणे नोंदवली गेली होती.
सिफिलीसची लक्षणं : सिफिलीस एक बॅक्टिरेयल इन्फेक्शन आहे. जो प्रामुख्यानं लैंगिक संपर्काद्वारे पसरतो. हा आजार झाल्यानंतर व्यक्तीच्या शरीरामध्ये ट्रॅपोनेमा पॅलिडम नावाचा विषाणू तयार होतो. यामुळे शरीराला खाज सुटते. त्यानंतर विषाणू शरीरातील इतर अवय डॅमेज करतो. या आजाराची लागण गरोधर महिलांना झाल्यास नवजात बाळाला पुरळ आणि विकृती निर्माण होते. संसर्ग झालेल्या मुलांमध्ये लहान वयात कोणतीही लक्षणं दिसत नाही. काही वर्षानंतर डोळ्यांना सूज येणे आणि श्रवण क्षमता कमी होणे यासारखी लक्षणं दिसू शकतात. या आजारावर प्राथमिक अवस्थेत योग्य उपचार केला तर तो बरा होण्याची शक्यत आहे. परंतु सिफिलीसवर उपचार न केल्यास मेंदू आणि हृदयात गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.