How To Reduce Uric Acid Naturally: युरिक ॲसिड ही तरुण आणि वृद्ध दोघांमध्ये एक सामान्य समस्या आहे. शरीरात यूरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्याने विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात. यामुळे युरिक ॲसिड नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. युरिक ॲसिडच्या सामान्य लक्षणांमध्ये पाय सुजणे, सांधे जडपणा आणि अत्यंत थकवा यांचा समावेश होतो. योग्य आहाराचे घेऊन युरिक ॲसिड प्रभावीपणे नियंत्रित केले जाऊ शकते. त्यासाठी तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करावा लागतो.
- चेरी:चेरीमध्ये अँथोसायनिन अँटिऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असते. हे युरिक ॲसिडचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. तसंच शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे.
- लिंबूवर्गीय फळे: मोसंबी, लिंबू आणि द्राक्षे यासारख्या फळांमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते आणि ते यूरिक ऍसिड कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. लिंबूवर्गीय फळे शरीरातून यूरिक ॲसिड बाहेर काढण्यास देखील मदत करतात.
- संपूर्ण धान्य:संपूर्ण धान्य खाणे यूरिक ॲसिड कमी करण्यासाठी चांगले आहे. ज्यांना युरिक ॲसिडची समस्या आहे त्यांनी ओट्स, क्विनोआ, ब्राऊन राइस, बार्ली इत्यादींचा आहारात नियमित समावेश करावा.
- बेरी:बेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी आढळते. फूड केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, बेरी यूरिक ॲसिडची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रास्पबेरीसारखी फळे नियमित खा.
- सफरचंद: सफरचंद हे फायबरचे उत्कृष्ट स्रोत आहे. यूरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी हे प्रभावी आहे. त्यामुळे यूरिक ॲसिड असणाऱ्यांनी सफरचंदाचा आहारात समावेश करावा.
- केळी:केळी पोटॅशियमचा भरपूर स्रोत आहे. लघवीद्वारे यूरिक ॲसिडच्या उत्सर्जनास प्रोत्साहन देऊन यूरिक ॲसिडची पातळी कमी करण्यास मदत करते.
- आवळा:गूसबेरीमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. हे यूरिक ऍसिड कमी करण्यास मदत करते.