महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

मधुमेह रुग्णांनी आवर्जून प्या 'हे' सूप

Soup Recipes For Diabetic: मधुमेह ग्रस्त लोकांना आहारासंबंधित अनेक पथ्य पाळावी लागतात. परंतु असे काही सूप आहेत, जे मधुमेह रूग्ण आपल्या आहारात घेऊ शकतात.

Soup Recipes For Diabetic
मधुमेह (CANVA)

By ETV Bharat Health Team

Published : Oct 8, 2024, 4:43 PM IST

Soup Recipes For Diabetic :सुस्त जीवनशैली आणि अयोग्य आहारामुळं होणाऱ्या आजारांमध्ये मधुमेह पहिल्या क्रमांकावर आहे. एकदा मधुमेहानं शरीरात शिरकार केला की खाण्यापिण्यासंबंधित अनेक पथ्य पाळावी लागतात. मधुमेह ग्रस्तांना नेहमी हेल्दी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. अन्यथा रुग्णांमध्ये साखरेची पातळी जलद गतीनं वाढण्याचा धोका असतो. पॅक किंवा फ्रोजन फूड रक्तातील साखरेची पातळी झपाट्यानं वाढवतात. तर काही पदार्थ असे आहेत, जे रक्तातील साखरेचं प्रमाण स्थिर ठेवतात. यांचा समावेश आपल्या आहारात केला तर मधुमेह नियंत्रीत ठेवण्यात मदत होऊ शकते. आज याच पदार्थांबद्दल आपण जाणून घेऊयात.

  • टोमॅटो सूप : टोमॅटोमध्ये असे काही गुणधर्म आहेत, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात. टोमॅटो सूप तयार करण्यासाठी टोमॅटो उकडून घ्या. टोमॅटो व्यवस्थित उकडल्यानंतर ते थंड करा आणि त्याची प्यूरी करा. यानंतर एक पातीलं घ्या आणि त्यात प्युरी घाला. पातील गॅसवर ठेवा आणि त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला. हे मिश्रम चांगलं शिजू द्या. उकडल्यानंतर त्यात काळीमिरी, तिखट, चवीनुसार साखर आणि मीठ घालून चांगलं मिक्स करा. पुन्हा मिश्रणाला चांगलं शिजूवा. दोन चार उकळ्या आल्यानंतर गॅस बंद करा. तुमचा टोमॅटो सूप रेडी आहे. आठवड्यातून दोन तीन वेळा टोमॅटो सूप मधुमेह रूग्ण पिऊ शकतात.
टोमॅटो सूप (CANVA)
  • मशरूम सूप : मशरूम सूप मधुमेह रुग्णासाठी चागलं आहे. मशरूम सूप तयार करण्यासाठी एक कप मशरूम, अर्धा कप लो फॅट दूध, चिरलेला कांदा, कपभर गव्हाचं पीठ, एक चमचा तेल, आणि चवीनुसार मीठ घ्या. सर्वप्रथम गॅसवर तवा ठेवा आणि मंद आचेवर कांदा भाजून घ्या. आता एक पातीलं घ्या आणि त्यात मशरूम आणि भाजलेला कांदा मशरूम आणि चवीनुसार मीठ घाला. हे मिश्रण व्यवस्थित शिजू द्या. शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि त्यात दूध घालून नीट मिक्स करा. हे मिश्रण पुन्हा गॅसवर ठेवा आणि मंद आचेवर शिजवा. 5 मिनिटांनी गॅस बंद करा आणि मिश्रणाला एका भांड्यात घेऊन सर्व्ह करा.
मशरूम सूप (CANVA)
  • चिकन आणि चणा सूप : हे प्रथिनं आणि फायबरनं समृद्ध असलेले हेल्दी सूप आहे. सूप बनवण्यासाठी हरभरे रात्री भिजत ठेवा. एक कप हरभरा, 2 टोमॅटो, 1 चिकन, दालचिनी, बडीशेप, लसून आणि आलं घालून कुकरमध्ये घाला. कुकरच्या 4, 5 शिट्या होवू द्या. आता मिश्रण कुकरमधून काढून घ्या. चिकन वेगळे करा आणि चण्यांना व्यवस्थि मॅश करा. एक पॅन घ्या त्यात 1 चमचा ऑलिव्ह ऑईल घाला. त्यानंतर त्यात लसूण, आलं, मिरेपूड, मीठ आणि चिरलेली शिमला मिर्च, चिकन घाला आणि मिश्रण व्यवस्थित परतून घ्या. व्यवस्थित उकळल्यानंतर कोथिंबीर घाला आणि सर्व्ह करा.
चिकन आणि चणा सूप (CANVA)
  • मसूर डाळ सूप : मसूर डाळ सूप पौष्टीक आहे. मसूर डाळीमध्ये पुरेशा प्रमाणात प्रोटीन्स असतात. त्यामुळे गरमागरम सूप तुम्ही बनवून पिऊ शकता. सूप बनवण्याकरिता भिजलेली मसूर डाळ, गाजर, लसून कांदा, सिमला मिरची आदी साहित्य घ्या. हे सर्व पदार्थ एका पातेल्यात घाला आणि चांगलं शिजवा. शिजल्यानंत या सूपमध्ये तुम्ही ओव्याची पानं, कोथिंबिर आणि इतर भाज्या घालू शकता.
डाळ सूप (CANVA)

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. 'या' चहानं डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास होईल छूमंतर
  2. मधुमेह ग्रस्तांनी नाश्त्यात घ्या 'हे' पदार्थ - Breakfast For Diabetes Patient

ABOUT THE AUTHOR

...view details