महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

व्हॅलेंटाईन डे 2025: असा साजरा करा 'प्रपोज-डे'; ठरेल अविस्मरणीय - VALENTINES DAY 2025

प्रपोज डेच्या दिवशी तुम्हालाही आपल्या प्रिय व्यक्तीला प्रपोज करायचं आहे. खाली दिलेल्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचा दिवस अविस्मरमीय करू शकता.

VALENTINES DAY 2025  VALENTINE WEEK 2025  PROPOSE DAY
'प्रपोज-डे (Freepik)

By ETV Bharat Lifestyle Team

Published : Feb 7, 2025, 5:57 PM IST

Propose Day:वर्षातील सर्वात रोमांटिक आठवडा सरू झाला आहे. या आठवड्याची प्रत्येक प्रेमी जोडपं आतुरतेनं वाट पाहतो. या आठवड्यातील प्रत्येक दिवस प्रेमी युगुलांसाठी खास असतात. त्याच व्हॅलेंटाईन आठवड्याचा दुसरा दिवस म्हणजेचं प्रपोज डे. जगभरात हा दिवस साजरा केला जातो. वर्षभर ज्याने आपल्यावर प्रेम लुटवले किंवा आपण ज्याला प्रेम करतो, अशा व्यक्तिला आपल्या मनातील भावना स्वतंत्रपणे सांगण्याचा हा दिवस. तुम्ही सुद्धा आपल्या जोडीदाराला हटके स्टाईलनं प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आम्ही तुम्हाला सांगत आहोत काही टिप्स. ज्यामुळं तुमचं प्रपोज डे अविस्मरणीय ठरू शकतं.

  • सुंदर फोटो फ्रेम: प्रपोज डे च्या दिवशी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींना एक सुंदर फोटो फ्रेम देऊ शकता. याकरिता तुम्ही एक चांगला किंवा पहिल्या भेटीचा फोटो निवडा. फोटोफ्रेम देवून तुम्ही तुमच्या जोडीदाराला आश्चर्यचकित करुन तुम्ही प्रेम व्यक्त करू शकता.
फोटो फ्रेम (Freepik)
  • रोमँटिक डिनर डेट:प्रपोज करण्यासाठी हा सर्वोत्तम क्षण असू शकतो. तुमच्या जोडीदाराला जेवणासाठी आमंत्रित करा आणि त्यांच्या आवडत्या पदार्थांपैकी एक पदार्थ स्वतः बनवा. जर तुम्हाला स्वयंपाक तयार करता येत नसेल तर बाहेरून ऑर्डर करण्याचा पर्याय देखील आहे. तुम्ही बाहेरच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊनही डिनर करताना तुमचं प्रेम व्यक्त करू शकता.
रोमँटिक डिनर डेट (Freepik)
  • गुलाबाचा गुच्छ: गुलाबाचं फुले हे प्रेमाचं प्रतीक आहे. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींना एक गुलाब देण्यापेक्षा गुलाबाच्या फुलांचा बुके द्या. ही एक अनोखी भेट ठरू शकते.
गुलाबाचा गुच्छ (Freepik)
  • सुंदर गिफ्ट्स: तुम्ही तुमच्या पार्टनरला नेहमी लक्षात राहिल असं गिफ्ट द्या. याकरिता तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आवडीनिवडीची माहिती असणे आवश्यक आहे. त्यांना सर्वात जास्त आवडत असलेली वस्तू गिफ्ट म्हणून देऊ शकता.
सुंदर गिफ्ट्स (Freepik)
  • डंब चॅरेड्स गेम: तुमच्या जोडीदाराला प्रपोज करण्यासाठी डंब चॅरेड्स हा गेम देखील एक चांगला पर्याय आहे. जोडीदाराला लगेच प्रपोज न करता, आधी वेगवेगळ्या चित्रांमधून त्याला तुमच्या भावनांची कल्पना द्या आणि नंतर प्रपोज करून महफिल जिंकून घ्या. तुमची ही कल्पना नक्कीच प्रेयसी किंवा प्रियकराला फार आवडेल.
  • संगीत: जर तुमच्या जोडीदाराला संगीताची आवड असेल, तर तुम्ही तुमच्या न बोललेल्या भावना याद्वारेही त्यांच्या पर्यंत पोहोचवू शकता. अशा क्षणांसाठी खास बनवलेल्या रोमँटिक गाण्यांची एक प्लेलिस्ट तयार करा. तुमच्या हृदयात काय आहे हे सांगण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
  • युनिक ज्वेलरी: सुंदर आणि युनिक ज्वेलरी देवून तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करू शकता. बाजारात ज्वेलरीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जसे की, सुंदर पेंडंट, नेकलेस, अंगठी, इअररिंग्स. तुम्ही ज्वेलरी ऑनलाईन देखील मागवू शकता.
  • प्रिंटेड टी शर्ट: दोघांच्या नावीची किंवा एखादं कोट्स असलेली प्रिंटेट टी शर्ट तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तील देवू शकता. बाजारात प्रिंटेड शर्टचा ट्रेंड सुरु आहे. प्रपोज डे ला तुम्ही सुंदर प्रिंटेड शर्ट देऊन तुमचा दिवस अस्मरणीय बनवू शकता.

ABOUT THE AUTHOR

...view details