Navratri Festival 2024: उद्यापासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. नवरात्रीमध्ये घरातील एक तरी व्यक्ती उपवास करतो. महिलाच नव्हे तर-पुरुष-मुलं-मुली देखील उपवास करतात. बहुतांश लोक उपवासामध्ये चप्पल देखील घालत नाही. उपवासादरम्यान एनर्जीची गरज असते. एनर्जेटिक राहण्यासाठी कोणते पदार्थ खावे? असा प्रश्न अनेकांना पडतो. याबद्दल आहार तज्ज्ञ डॉ.रेणुका माइंदे यांनी माहिती दिली आहे. त्याच्या मते या पदार्थांचा सेवन उपवासादरम्यान केल्यास एनर्जेटिक राहू शकता.
साबुदाणा खिचडी: साबुदाण्यात कार्बोहायड्रेट्स पुरेशा प्रमाणात असतात. यामुळे तुम्हाला एनर्जी मिळते. शिवाय साबुदाणा खिचडीमधून फाबरही मिळते, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर पोट भरल्यासारख वाटते.
वरीच्या तांदळाचे पदार्थ उत्तम:उपवासदरम्यान तुम्ही वरीच्या तांदळाचे पदार्थ खावू शकता. वरीच्या तांदूळापासून तयार केलेले पदार्थ आरोग्यासाठी हेल्दी असतात. तुम्ही वरीचा भात, थालिपीठ किंवा आमटी करुन खाऊ शकता. यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळू शकते.
नारळ पाणी :नारळपाण्यामध्ये आवश्यक पोषक घटक असतात. नारळ पाणी नैसर्गिक उर्जा प्रदाण करते. ही एक हायड्रेटिंग ड्रींक आहे. नारळ पाण्यामध्ये पोटॅशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी, तसंच अॅंटीऑक्सिडेट्स यासारखे पोषक घटक असतात. यामुळे शरीराला उर्जा मिळते. नवरात्रीच्या उपवासादरम्यान तुम्ही नारळ पाणी प्यावं. यामुळे तुम्ही दिवस भर एनर्जेटिक रहाल.
बदाम : बदामामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. यामुळे नवरात्री उपवासादरम्यान तुम्ही बदाम खाल्ल्यास तुमचे पोट भरल्या सारख वाटेल. वाळलेले बदाम खाण्याऐवजी भिजलेले बदाम खाणे आरोग्यासाठी चांगलं आहे.