Benefits Of Drinking Ghee With Milk:दूध पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जाते. परंतु, दुधात तूप मिसळून प्यायल्यास आरोग्यदायी अनेक फायदे मिळू शकतात. आयुर्वेद तज्ञ सांगतात की तूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दुधात तूप मिसळून पिण्याला आयुर्वेदात अमृत मानलं जाते. त्यामुळे हाडे मजबूत होतात शिवाय सर्दी, फ्लू सारख्या संसर्गजन्य आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. तूपामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन ए आणि के, तसंच अँटिऑक्सिडंट्सारखे पोषक घटक आढळतात. परंतु, वजन वाढण्याच्या भीतीनं अनेक जण तूपापासून होण्याऱ्या फायद्यापासून अलिप्त असतात. वजन वाढेल या भितीनं तूप खाणं टाळत असाल तर तुम्ही मर्यादित प्रमाणात तूप खावू शकता. यामुळे झोपेसंबंधित समस्या दूर होतात. तसंच सांधेदुखी सारख्या दुर्धर समस्या दूर होतात.
आयुर्वेद तज्ञ डॉ. गायत्रीदेवी यांनी सांगितलं की, तूपामुळे मेंदू सक्रीय होतो. डोळ्यांचे आरोग्य सुधारते तसंच हाडे मजबूत होतात. दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधामध्ये एक चमचा तूप मिसळून प्यायल्यास तुम्हाला चांगला फायदा होईल.
- दुधात तूप मिसळून पिण्याचे फायदे
- पचन सुधारते:तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दुधामध्ये तूप घालून प्यायल्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. कारण तूपात ब्युटीरिक ॲसिड भरपूर असते. कोमट दुधात तूप मिसळून रोज प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. त्यामुळे पोटाची जळजळही कमी होते. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च मध्ये 2019 मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, संशोधकांना आढळले की, ब्युटीरिक ऍसिड पचनमार्गात जळजळ कमी करते आणि चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रोत्साहन देते.
- सांधेदुखी कमी करते: आयुर्वेदिक तज्ञ सांगतात की सांधेदुखीचा त्रास असलेल्यांना रोज झोपण्यापूर्वी कोमट दुधात तूप मिसळून प्यायल्याने आराम मिळतो. तूप ओमेगा -3 फॅटी ॲसिड आणि संयुग्मित लिनोलिक ॲसिड (सीएलए) सारख्या दाहक-विरोधी संयुगांनी समृद्ध आहे. यामुळे जळजळ आणि सांधेदुखी कमी होते. सांधेदुखीचा त्रास असलेल्या लोकांनाही दुधात तूप मिसळून प्यायल्यानं फायदा होतो.
- त्वचा निखारते: तूपात विरघळणारे जीवनसत्त्व ए, डी, ई आणि के असते. तज्ञांच्या मते, ते आपल्याला निरोगी ठेवते. तसंच त्वचा चमकदार बनवते. कोमट दुधात एक चमचा तूप मिसळून रोज प्यायल्यानं त्वचा सुधारते.
- झोपेसाठी फायदेशीर:तूप आणि दूध या दोन्हीमध्ये अमिनो ॲसिड ट्रायप्टोफॅन असते. त्यामुळे चांगली झोप येते. तज्ञांचे म्हणणे आहे की, झोपेच्या आधी कोमट दुधात तूप मिसळून प्यायल्यानं झोपेच्या समस्या असलेल्या लोकांना आराम मिळू शकते.