हैदराबाद Vitamin D Rich Foods: जीवनसत्त्वे शरीरासाठी संरक्षणात्मक कवच म्हणून काम करतात. शरीराच्या आवश्यकतेनुसार जीवनसत्त्व न मिळाल्यास अवयवांच कार्य मंदावते. यापैकीच एक व्हिटामीन डी. शरीराच्या चांगल्या कार्यासाठी व्हिटीमीन डी फार महत्त्वाचं आहे. हाडांसह दातांच्या आरोग्यासाठी व्हिटामीन डी महत्वाची भूमिका बजावते. जीवनसत्त्वे डी ची कमतरता भासल्यास हेअर लॉस, थकवा, डिप्रेशन, विकनेस आणि भूक कमी होणं अशा समस्या उद्भवू शकतात. तसंच व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. सुर्यांची किरणं व्हिटामीन डी मिळण्याचा मोठा स्त्रोत आहे. परंतु उन्हाळ्यात उन्हात बसणं शक्य नाही. पावसाळ्यात कमी प्रमाणात सुर्यप्रकाश मिळतो. तर, हिवळ्यामध्ये कोवळ्या उन्हात बसून आपण व्हिटामीन डी घेवू शकतो. परंतु कामाच्या व्यस्ततेमुळे ते देखील शक्य नाही, अशा परिस्थित व्हिटामीन ‘डी’ची मात्रा मुबलक प्रमाणात मिळण्यासाठी तुम्ही आहारात काही पदार्थांचा समावेश करु शकता.
मासे: फॅटी सॅल्मन, ट्यूना, मॅकरेल आणि सार्डिनमध्ये कॅल्शियम आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिडसह व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असतं, असं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या रिपोर्टमध्ये नमुद केलं आहे. पावसाळ्यात मासे खाल्ल्यानं व्हिटॅमिन डीची कमतरता टाळता येते.
मशरूम:सूर्यप्रकाशात पिकवलेल्या काही प्रकारच्या मशरूममध्ये व्हिटॅमिन ‘डी’चं प्रमाण जास्त असतं, असं प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ लक्ष्मी किलारू म्हणतात. तसंच, त्यात कॅल्शियम, B1, B2, B5 आणि तांबे असल्यानं ते पावसाळ्यात घेतले जाऊ शकतात.
अंडी:अंडी हे व्हिटॅमिन डी मिळवण्याचा उत्तम स्त्रोत आहे. अंडी व्हिटॅमिन डी आणि प्रथिनांनी समृद्ध आहेत. तसंच अंड्यातील पिवळं बलक जास्त प्रमाणात चरबीयुक्त असल्यानं दररोज एक अंड्यातील पिवळ बलक खाणं आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं
दूध आणि दही:दूध आणि दही शरीराला व्हिटॅमिन डी प्रदान करण्यात मदत करतात. तसंच, त्यात कॅल्शियम आणि प्रथिनं भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे, याचं सेवन करून तुम्ही व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेपासून स्वतःचं संरक्षण करू शकता.