हैदराबाद Rules For Bathing In Pregnancy : काही लोकांना ऋतू कोणताही असो, रोज गरम पाण्यानं अंघोळ करण्याची सवय असते. त्यात महिलांचा देखील समावेश आहे. काही महिला उन्हाळ्यातही गरम पाण्यानं अंघोळ करतात. मात्र, गरोदर महिलांनी गरम पाण्यानं अंघोळ करताना काळजी घ्यावी, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. गरोदरपणात गरम पाण्यानं आंघोळ केल्यास गर्भातील बाळाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
सर्वसाधारणपणे, गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यांत काळजी घेणं फार महत्वाचं आहे. कारण या काळात बाळाचे अवयव, मेंदूचा विकास, न्यूरोलॉजिकल फंक्शन्स सुरू होतात. म्हणूनच या तिमाहीला ऑर्गन जेनेसिस कालावधी म्हणतात. त्यामुळे मूल निरोगी जन्माला येतो. गरोदर महिलांनी या काळात खूप काळजी घेणं आवश्यक आहे, असं मत प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रजनी यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या मते, अंघोळीच्या बाबतीत काही खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
गरम पाण्यानं आंघोळ करणे टाळा! डॉ. रजनी यांच्या मते, गरोदर महिलांनी शक्य तितक्या थंड पाण्यानं आंघोळ करणं चांगलं आहे. गरोदर महिलांसाठी उकळत्या गरम पाण्यानं आंघोळ करणं चांगलं नाही, असं केल्यास जन्माला आलेल्या बालकांमध्ये आरोग्यासंबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. थंड पाण्यानं अंघोळ करनं कठीण असल्यास गरम पाण्याऐवजी कोमट पाण्यानं अंघोळ करणं फायदेशीर आहे, असं त्यांनी सांगितलं.