How to Lower Cholesterol :अयोग्य अहार पद्धतीमुळे अनेकांना कोलेस्टेरॅालच्या समस्येशी सामना करावा लागतो. लहानांपासून मोठे देखील या समस्येचे बळी पडत आहेत. विशेष म्हणजे शरीराच्या मर्यादेपलीकडे कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यास हृदयविकाराचा झटका तसंच अन्य भयावह आजाराची लागण होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे.
कोलेस्टेरॉलचे प्रकार : आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल आहेत. एक एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्टेरॉल आणि एचडीएल चांगलं कोलेस्टेरॉल. एलडीएल कोलेस्टेरॉल हे नसांमध्ये सापडणारं एक प्रकारचं फॅट आहे. यामुळे धमन्या ब्लॉक होतात. खराब कोलेस्टेरॉलमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक्स तयार होते. परिणामी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. यामुळे आपल्यापैकी बहुतांश लोक खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी विविध उपाय करतात. काही जण अन्न कमी खातात. काही लोक कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी गोळ्या देखील घेतात. परंतु, आहार घेण्याच्या पद्धतीत थोडेफार बदल केले तर, तुम्ही देखील कंटाळवाणे औषधं न घेता कोलेस्टेरॉलची पातळी कमी करु शकता. त्यासाठी तंज्ज्ञांनुसार काय करावे, जाणून घेऊयात.
आपल्या अन्नात 20 टक्के कोलेस्टेरॉल: बहुतेक लोकांना माहित नसतं की, आपण खातो त्या अन्नाद्वारे फक्त 20 टक्के कोलेस्टेरॉल तयार होतो. शरीरातील यकृत आणि आतडे उर्वरित कोलेस्टेरॉल तयार करतात. तसंच आपण खात असलेल्या अन्नातील बहुतेक कोलेस्टेरॉल हे मांस आणि दुग्धपदार्थांपासून तयार होते. त्याचं मुख्य कारणं म्हणजे त्यातील सॅच्युरेटेड फॅट्स. यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
सॅच्युरेटेड फॅट्स कमी करणं आवश्यक: सर्वप्रथम आपल्या रोजच्या आहारातील सॅच्युरेटेड फॅट्स कमी करणं आवश्यक आहे. त्यासाठी आहारात चरबीयुक्त पदार्थांचा समावेश टाळा. त्याऐवजी काही प्रकारचे वनस्पती तेल, एवोकॅडो, मासे खावं. तज्ज्ञांच्या मते, फायबर-समृद्ध वनस्पती अन्न जसं की भाज्या, फळं, बीन्स, तृणधान्य आणि ओट्स दैनंदिन आहारात समाविष्ट करा. कारण हे सर्व वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असल्याचं सांगितलं जातं. तसंच चीजबर्गर, जंक फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि तळलेले पदार्थ टाळावेत.
तुमच्या आहारात यांचा समावेश करा: तज्ज्ञांच्या मते, खालील पूरक आहार एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.