How To Make Mirchi Masala Fry: महाराष्ट्रीयन लोकांना झणझणीत पदार्थ फार आवडतात. खास जेवणात तोंडी लावणे हा प्रकार नियमच आहे. चटणी, लोणचं, कोशिंबिर, पापड, ठेचा, लसणाची चटणी, मिरचीचा खर्डा असल्यास जेवणाची रंगत वाढते. तुमच्या तोंडाची चव वाढवण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलोय. ती म्हणजे मसाला मिरची फ्राय. मिरची फ्राय तयार करण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. चला तर जाणून घेऊया मिरची मसाला फ्राय तयार करण्याची साधी आणि सोपी पद्धत.
- मसाला मिरची फ्राय साठी साहित्य
- मोठ्या आकाराच्या मिरच्या 1/2 किलो
- चणा डाळ पीठ - अर्धी वाटी
- हळद - अर्धा टीस्पून
- मिरची - 2 चमचे
- धने पावडर - 2 चमचे
- आमचूर पावडर - 2 चमचे
- गरम मसाला - अर्धा टीस्पून
- जिरे पावडर - अर्धा टीस्पून
- कसूरी मेथी - 1 टीस्पून
- मीठ - चवीनुसार
- तेल - 4 टेस्पून
- लसणाच्या पाकळ्या - ४
- लिंबाचा रस - 2 टेस्पून