महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

पोट सुटलंय? व्यायामाशिवाय अशाप्रकारे करा पोटाची चरबी कमी - HOW TO LOSE BELLY FAT

घरातील एक तरी व्यक्ती पोटाच्या अतिरिक्त चरबीमुळे परेशान आहे. कित्येक उपाय करूनही चरबी कमी होत नाही. परंतु, व्यायामाशिवाय देखील तुम्ही पोटावरील चरबी कमी करू शकता.

EASY WAYS TO REDUCE BELLY FAT  HOW TO GET RID OF BELLY FAT  NATURAL WAYS TO LOSE BELLY FAT  TIPS FOR LOSE BELLY FAT
पोटावरील चरबी कमी करण्याचे उपाय (Freepik)

By ETV Bharat Lifestyle Team

Published : Jan 24, 2025, 3:44 PM IST

How To Lose Belly Fat: पोटातील चरबी ही आपल्यापैकी अनेकांना भेडसावणारी एक सामान्य समस्या ठरत आहे. व्यायामाचा अभाव, जीवनशैलीतील बदल आणि खराब आहार या सर्व गोष्टी पोटावर चरबी जमा होण्यास कारणीभूत ठरू शकतात. चरबी कमी करण्यासाठी कित्येक उपाय केली जातात. अनेक लोक जिममध्ये जातात. परंतु जिममध्ये जाऊन देखील पोटावरील चरबी कमी करण्यास ते यशस्वी होत नाहीत. तसंच महागडे पावडर वापरून देखील काही फरक पडत नाही. परंतु तुम्हाला माहिती आहे काय? तुम्ही व्यायामाशिवाय देखील पोटाची चरबी कमी करू शकता. कसं ते पाहूया.

  • प्रथिने समृद्ध अन्न:अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये केलेल्या अभ्यासात असं दिसून आलं की, पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थ खाणं प्रभावशाली आहे. प्रथिने चयापचय सुधारण्यास आणि भूक कमी करण्यास देखील मदत होते. यामुळे पोटावरील चरबी कमी होवू शकते.
  • फायबर समृध्द अन्न: तुमच्या आहारात विरघळणाऱ्या फायबर युक्त पदार्थांचा समावेश करा. शरीरातील चरबीचे शोषण कमी करण्यासाठी हे फायदेशीर आहे. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी आणि भूक नियंत्रित ठेवण्यासाठी फायबरयुक्त पदार्थ खाणं चांगला पर्याय आहेत. हे हृदयविकाराचा धोका कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते. त्यामुळे तुमच्या आहारात ओट्स, फ्लेक्स सीड्स, एवोकॅडो आणि शेंगा यांचा समावेश करा.
  • भरपूर पाणी प्या:शरीराचे एकंदर आरोग्य राखण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. हे पोटात चरबी जमा होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करते. तसंच शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यात आणि पचनक्रिया सुधारण्यात पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. भूक नियंत्रणात ठेवण्यासाठीही हे उत्तम आहे. त्यामुळे रोज किमान 8 ग्लास पाणी प्या.
  • चांगली झोप: शरीराचे वजन राखण्यात झोप मोठी भूमिका बजावते. जेव्हा झोपेची कमतरता असते. तेव्हा भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स असंतुलित होऊ शकतात. परिणामी जास्त भूक लागते. यामुळे रोज किमान 7 ते 9 तासांची झोप घ्या.
  • उपवास: पोटाची चरबी कमी करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे अधूनमधून उपवास करणे आहे. हे चयापचय क्रिया सुधारण्यास आणि इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी करण्यास मदत करू शकते.
  • जास्त खाऊ नका:पोटाची चरबी वाढू नये आणि वजन कमी होण्यासाठी अन्नाचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. त्यामुळे खाण्यासाठी लहान प्लेट्स निवडा. अनेक अभ्यासातून असं दिसून आलं की, ते खाण्याची इच्छा कमी करण्यास मदत करू शकते.

ABOUT THE AUTHOR

...view details