महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

अशाप्रकारे करा शरीरातील 'व्हिटॅमिन बी 12' ची कमतरता पूर्ण - VITAMIN B12 DEFICIENCY RICH FOODS

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे आरोग्यविषयक अनेक समस्या उद्भवू शकतात. चला तर पाहूया शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता कशाप्रकारे पूर्ण करावी.

VITAMIN B12 DEFICIENCY FOODS  HOW TO SOLVE VITAMIN B12 DEFICIENCY  NATURAL REMEDIES FOR B12 DEFICIENCY  HOME REMEDIES FOR B12 DEFICIENCY
व्हिटॅमिन बी 12 (Getty Images)

By ETV Bharat Health Team

Published : Jan 25, 2025, 12:19 PM IST

Updated : Jan 25, 2025, 7:24 PM IST

Vitamin B12 Deficiency Rich Foods:अलीकडच्या काळात बरेच लोक व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेनं त्रस्त आहेत. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत चालल्या आहेत असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. व्हिटॅमिन बी-12 रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते, याच्या कमतरतेमुळे मेगालोब्लास्टिक ॲनिमिया होतो. यामुळे आहारात जास्त व्हिटॅमिन घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

सहसा वयाच्या चाळिशीनंतर शरीरातील व्हिटॅमिन बी 12 चं प्रमाण कमी व्हायला लागतं. असं म्हटलं जाते की, दीर्घकाळासाठी जे लोक औषधांचं सेवन करतात सहसा त्यांच्या शरीरातील बी 12 च्या क्षमतेवर परिणाम होतो. 2018 मध्ये जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसारव्हिटॅमीन बी 12 प्राण्यांपासून तयार होणाऱ्या अन्नामध्ये मुबलक प्रमाणात असते, असं दर्शवण्यात आलं आहे.

  • मांस: तज्ज्ञांच्या मते, मांस उत्पादनांमध्ये व्हिटॅमिन बी 12 भरपूर प्रमाणात असते. यामुळे तज्ज्ञ आठवड्यातून काही वेळा आहारात मांस समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. परंतु मांस आहार घेताना कमी चरबी युक्त घेण्याचा सल्ला देखील दिला जातो.
  • दूध: तज्ज्ञांच्या मते, दुधामध्ये व्हिटॅमिन बी12 देखील असतो. असं म्हटलं जाते की, एक कप दुधात दैनंदिन गरजेच्या 20 टक्के कॅल्शियम असते. तसंच नियमित दूध प्यायल्यास शरीराला व्हिटॅमिन बी 12 मिळू शकते.
  • दही: या दुग्धजन्य पदार्थामध्ये व्हिटॅमिन-12 भरपूर प्रमाणात असते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. असं म्हटलं जाते की, एक कप दह्यात 28% व्हिटॅमिन-12 असते. म्हणूनच व्हिटॅमिनच्या कमतरतेने त्रस्त असलेल्या लोकांना आहारात दही घेण्याचा सल्ला दिला जातो.
  • अंडी:अंड्यांमध्ये व्हिटॅमिन-12 मुबलक असते. विशेषतः अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये त्याचं प्रमाणं जास्त असतं. म्हणूनच फक्त अंड्याचा पांढरा भाग नव्हे तर संपूर्ण अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. दोन अंड्यांमधून १.१ मायक्रोग्रॅम बी १२ व्हिटॅमिन मिळू शकतं, असं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.
  • तृणधान्ये:तृणधान्ये शरीरासाठी सर्व प्रकारे फायदेशीर आहेत. म्हणूनच सकाळच्या न्याहारीसाठी एक कप धान्य घेण्याची शिफारस केली जाते. याच्या सेवनानं भरपूर व्हिटॅमिन-12 मिळते.
  • सोया पनीर:सोया मिल्कपासून बनवलेले टोफूमध्ये व्हिटॅमिन-12 मुबलक प्रमाणात असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. रोजच्या आहारात याचे सेवन केल्यानं व्हिटॅमिन बी 12 च्या समस्येवर मात करता येवू शकते.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

Last Updated : Jan 25, 2025, 7:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details