Natural Makeup Remover: मेकअप करणे हा मुलींचा तसंच महिलांचा आवडीचा विषय आहे. बऱ्याच महिला मेकअप केल्याशिवाय बाहेर पडत नाही. लग्न असो किंवा इतर समारंभ इतरांपेक्षा सुंदर दिसावं असं प्रत्येक महिलेला वाटतं. मेकअप व्यवस्थित बसावे याकरिता सनस्क्रिम किंवा मॉइश्चरायझर, प्रायमर, फाउंडेशन, कन्सीलर, कॉम्पॅक्ट, आयलायनर,आयशॅडो, मस्करा, लिपस्टिक आदी वस्तू लावल्या जातात. चेहऱ्यावर मेकअप करणं जेवढं गरजेचं आहे त्यापेक्षा किती तर महत्त्वाचं आहे मेकअप काढण्याची पद्धत. कारण मेकअप तसंच ठेवून झोपल्यामुळे चेहऱ्याचं नुकसान होऊ शकते.
मेकअप रिमुव्ह करण्यासाठी बाजारात बरेच मेकअप रिमूव्हर्स देखील उपलब्ध आहेत. बाजारातील रिमूव्हर्स महागडे तर असतात शिवाय त्यात अनेक केमिकल देखली असतात. यामुळे त्वचा खडबडीत आणि कोरडी होण्याची दाट शक्यता असते. हे केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा तुम्ही घरी नैसर्गिकरित्या तयार केलेलं मेकअप रिमूव्हर वापरू शकता. यामुळे मेकअप सहज निघतो शिवाय काही साइडईफेक्ट्स देखील होत नसल्यामुळे चेहऱ्यासाठी हे चांगले आहेत. यामुळे त्वचा चमकदार, मुलायम आणि चांगली होऊ शकते.
- ग्लिसरीन आणिगुलाबपाणी: ग्लिसरीन आणि गुलाबपाण्याचे मिश्रण तयार करा. आणि ते चेहऱ्यावर स्प्रे करा. 15 मिनिट तसंच ठेवून त्यानतर चेहरा थंड पाण्यानं धुवा. यामुळे मेकअपस सहज निघून जाईल. तसंच त्वचा चमकदार आणि स्वच्छ होण्यास मदत होईल.
- बदाम तेल:मेकअप काढण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे बदाम तेल. एक चमचा बदाम तेल चेहऱ्यावर लावा आणि चेहऱ्याची नीट मसाज करा. यानंतर कापसाच्या सहाय्यानं ते स्वच्छ पुसून घ्या. यामुळे त्वचा सॉफ्ट तसंच चमकदार होईल.
- ऑलिव्ह ऑईलआणि लिंबाचा रस:एक चमचा लिंबाच रस घ्या त्यात दोन चमचे ऑलिव्ह ऑइल घाला आणि चांगलं मिसळा. तयार झालेलं मिश्रण व्यवस्थित चेहऱ्यावर लावा आणि पाच मिनिटं तसंच राहू द्या. पाच मिनिटांनी कापसाच्या सहाय्यानं चेहरा पुसून घ्या आणि थंड पाण्यानं धुवा. यामुळे त्वचा चमकदार आणि मऊ होण्यास मदत होते.
- हळद आणि लिंबाच रस: एक चमचा हळद घ्या. आता त्यात दोन चमचे लिंबाचा रस घाला आणि चांगलं मिसळा. तयार झालेलं मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटं तसंच राहू द्या. यानंतर चेहरा कोमट पाण्यानं धुवा. यामुळे मेकअप निघून चेहरा मऊ होईल.
- दही आणि बेसन: मेकअप काढण्यासाठी दही आणि बेसन चांगला पर्याय आहे. याकरिता दोन चमचे दही घ्या त्यात एक चमचा बेसन घाला आणि पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि पाच मिनिटं तसंच ठेवा. आता मसाज करा. मसाज झाल्यानंतर चेहरा कोमट पाण्यानं धुवा. यामुळे चेहऱ्यावरील मेकअप निघेल शिवाय चेहरा चमकदार दिसण्यास मदत होईल.
- मध आणि नारळ तेल:नारळाचं तेल त्वचेसाठी फायदेशीर आहे. नारळाचं तेल घ्या आणि त्यात मध घाला. चांगलं मिसळा आणि चेहऱ्यावर समप्रमाणात लावा. आता हलक्या हातानं चेहऱ्याची मसाज करा. कापसाच्या साहाय्यानं चेहरा पुसून टाका नंतर पाण्यानं चेहरा धुवा. यामुळे मेकअप सहज निघून जाईल आणि चेहरा देखील मऊ होण्यास मदत होईल.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ