Coriander Juice:आपल्याकडे जवळपास प्रत्येक भाजीत कोथिंबीर असतेच असते. कोथिंबीरीमुळे अन्नाला चव येते. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? की, अन्नाला चव प्रदान करण्याव्यतिरिक्त कोथिंबीर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. कोथिंबीरमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, बी, के, कॅल्शियम, प्रोटीन, या सारखे पोषक घटक पुरेशा प्रमाणात आढळतात. तसंच अॅंटिऑक्सिडट्स, क्षयरोग विरोधी अनेक गुणधर्म आढळतात. कोथिंबीरचं पाणी प्यायल्यास पचकक्रिया सुधारते. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि वजन कमी करण्यासाठी कोथिंबीरचे पाणी उपयुक्त आहे.
- कोथिंबीर पाण्याचे फायदे
- वजन कमी:वजन कमी करण्यासाठी कोथिंबीर फायदेशीर आहे. झटपट वजन कमी करण्याऱ्यांनी त्यांच्या आहारामध्ये कोथिंबीर पाण्याचा समावेश करणे गरजंच आहे. कोथिंबीर पाण्यानं चरबी जलद बर्न होते.
- रोगप्रतिकार शक्ती वाढते:कोथिंबीरच्या रसामध्ये शरीराला व्हिटॅमिन ए, बी, सी आणि के प्राप्त होते. यामुळे रोगप्रतिकार शक्ती बुस्ट होते. शिवाय कोथिंबीरीमुळे माणूस अनेक आजारांपासून दूर राहतो. अतिरीक्त परिणामासाठी दिवसातून दोन वेळा कोथिंबीर पाणी प्या. यामुळे वजन झपाट्यानं कमी होईल.
- शरीरातील विषारी घटक बाहेर: शरीरातील विषारी घटक बाहेर न गेल्यास अनेक आजार उद्भवतात. किडनीमधील घाण आणि विषारी पदार्ध बाहेर टाकायचे असतील तर कोथिंबीरचे रस फायदेशीर आहे.
- त्वचेसाठी फायदेशीर: कोथिंबीरच्या पाण्यात जीवाणूवाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म आहेत. तसंच यात आढळणाऱ्या दाहक विरोधी गुणधर्मामुळे त्वचेसंबंधित समस्या दूर होतात. तसंच चेहऱ्यावरील मुरुम देखील कमी होण्यास कोथिंबीर पाणी फायदेशीर आहे.
- कोथिंबीर रसाचं नियमित सेवन केल्यास निद्रानाशाचा समस्या दूर होतात. परिणामी झोपेची गुणवत्ता सुधारते.
- कोलेस्ट्रॉल आणि उच्चरक्तदाब कमी करण्यासाठी कोथिंबीर पाणी उपयुक्त आहे.
- पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी तसंच गॅस आणि अपचन सारख्या समस्या दूर करण्यासाठी कोथिंबीर पाणी फायदेशीर आहे.
- संधिवात आणि स्नायूसंबंधित दुखण्यावर कोथिंबीर रस चांगलं माणलं जाते.
संदर्भ