हैंद्रराबाद- जगभरात चहा किंवा कॉफी प्रेमींची संख्या जास्त आहे. बहुतांश लोकांच्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफी पिण्यानं होतं असते. हिवाळा, उन्हाळा असो वा पावसाळा या तिन्ही ऋतूमध्ये चहा-कॉफी पिली जाते. काही लोक या पेयाचे इतके वेडे असतात की ते दिवसाला कितीही कप चहा-कॉफी रिचवू शकतात. दिवसभरात किती चहा पिहावं याचं गणित कुणी पाळत नाही. परंतू दिवसभरातून किती कप चह किंवा कॉफी सेवन करावी याबद्दलची माहिती इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने नुकतीच प्रकाशित केली आहे.
रिसर्च काय म्हणतो?
इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च व नॅशनल इंस्टीट्युट ऑफ न्यूट्रिशन यांनी नुकताच एक रिसर्च केला आहे. त्यामध्ये दिवसभरात किती कप चहा पिहावा याबद्दल सांगितलं आहे. अभ्यासानुसार चहा व कॉफीमध्ये कॅफिन नावाचा पदार्थ असतो, त्याच्या अतिसेवनानं शरीरातील मज्जासंस्थेवर परिणाम होतो. कॅफिन मज्जासंस्थेला उत्तेजित करतं त्यामुळे मानसिक अवलंबित्व वाढतं. मानसिक अवलंबित्व म्हणजे चहा किंवा कॉफीचे व्यसन लागणं होय. ते सेवन केल्याशिवाय तुमचे शरीर नीट कार्य करत नाही. आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार कॅफिनचे अतिसेवन टाळण्यात यावं.
दिवसभरात किती कॅफिन सेवन करावे
आयसीएमआरच्या रिपोर्टनुसार नियमीत 150 मिलीलीटर कप ब्रूड कॉफीमध्ये 80 ते 120 मिलीग्राम कॅफिन असते. तसेच इंस्टेंट कॉफीत 50 ते 65 मिलीग्राम कॅफिनचे प्रमाण असतं. तसचं चहाच्या एका कपामध्ये 30 से 65 कॅफिनचे प्रमाण असतं. आयसीएमआरनुसार एका व्यक्तीनं दिवसभरात 300 मिलीग्राम कॅफिन सेवन करावं, असं म्हटलंय. दिवसभरामध्ये 2.5 कप ब्रुड कॉफी पिऊ शकता. तसेच 4.5 कप इंस्टेंट कॉफी व 4.5 कप चहा पिऊ शकता. यापेक्षा अधिक कॉफी किंवा चहा सेवन केल्यास तुम्हाला अनेक समस्यांचा समाना करावा लागतो.