महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

नवरा-बायकोनं फॉलो करा 'या' टिप्स; नात्यात येणार नाही दुरावा - COUPLE POSITIVE RELATIONSHIP TIPS

नवरा-बायकोच्या नात्यात अनेक गोड-तिखट प्रसंग येतात. त्यामुळे नात्यात दूरावा निर्माण होवू शकतो. परंतु काही टिप्स फॉलो केल्यास तुम्ही चांगलं जीवन जगू शकता.

Couple Positive Relationship Tips
रितेश आणि जेनेलिया (Instagram)

By ETV Bharat Lifestyle Team

Published : Nov 30, 2024, 12:15 PM IST

Couple Positive Relationship Tips: नवरा-बायकोच्या नात्याची रेशीम गाठ काचेप्रमाणे नाजूक असते. त्यामुळे या नात्याला अलगत जपलावं लागतं आणि तेवढचं पारदर्शक देखील ठेवावं लागतं. यामुळे नात आणखी घट्ट होतं. परंतु, आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जोडीदार आपल्या साथीदाराला पाहिजे त्या प्रमाणात वेळ देऊ शकत नाही. यामुळे दोघांमध्ये लहान-लहान गोष्टींवरून भांडण होवू लागतात. परिणामी न कळत नात्यात कटुता निर्माण होवू लागते. म्हणून या नाजूक नात्याची दररोज काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे, असं मत तज्ञांनी व्यक्त केलं. कारण नवरा बायकोच्या नात्यामधील सकारात्मक गोष्टी दोघांमधील नातं घट्ट करतात. चला तर पाहूया नवरा-बायकोचं नातं टिवकवू ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

  • रागावर नियंत्रण ठेवा:रागावर ताबा नसल्यामुळे राग आल्यावर आपण समोरच्या व्यक्तीला वाटेल ते बोलू लागतो. आपल्या बोलण्यामुळे समोरचा व्यक्ती दुखावला जाईल याची आपल्याला चिंता नसते. यामुळे आपल्या शब्दांमुळे आपला जोडीदार किती दुखावला याची आपल्याला कल्पना आपल्याला नसते. परिणामी नात्यात कटूता वाढायला लागते. म्हणून शक्य असल्यास राग आल्यावर दोघांनी एक मेकांशी बोलू नये. काही वेळ शांत बसावं. कारण रागाच्या भरात बोललेल्या शब्दामुळे जोडीदाराच्या मनात आपल्याप्रती असलेला आदर तुम्ही गामावू शकता.
  • आदर करा: दोघांनीही एक मेकांचा आदर करा. कारण यामुळे नातं घट्ट होतं. बऱ्याचदा असं होतं की, आपण आपल्या जोडीदाराचा आदर करत नाही. इतरांसमोर त्यांची थट्टा करतो. यामुळे जोडीदाराला राग येवू शकतो. मज्जा, मस्ती करताना आजुबाजूला कुणी आहेत याचा भान ठेवा आणि जोडीदाराचा आदर करा. कुटुंबातील इतर व्यक्तीसमोर आपल्या जोडीदाराचा अनादर करू नये.
  • एक मेकांना टाइम द्या:आपल्यापैकी बहुतेक जण ऑफीसमधून घरी परतल्यानंतर तासनतास फोनमध्ये काहीतरी करत बसतात. फोन चालवण्यात कधी-कधी आपण एवढे व्यस्त होतो की, समोरचा व्यक्ती आपल्यासोबत बोलत आहे याचं आपल्याला भान राहत नाही. आपल्या या सवयीमुळे नात्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे नवरा बायकोमध्ये भांडणंही जास्त वाढतात. त्यामुळे घरात वावरत असताना फोनकडे दुर्लक्ष करा. आपला संपूर्ण वेळ कुटुंबाल द्या. त्यांच्याशी गप्पा मारा, दोघेही सोबत मिळून स्वयंपाक करा. तसंच इतर कामात जोडीदाराची मदत करा. यामुळे नवरा बायकोच्या नात्यात गोडवा निर्माण होतो.
  • विश्वास ठेवा:नातं जास्त काळ चांगलं राहावं याकरिता विश्वास फारं महत्त्वाची भूमिका बजावतो. तुम्ही तुमच्या जोडीदारावर स्वतः पेक्षा जास्त विश्वास ठेवा. कोणाच्याही सांगण्यावर विश्वास ठेवल्यास दोघांमध्ये दूरावा येवू शकतो. जोवर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी एखादी गोष्ट पाहात नाही तोपर्यंत इतरांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. कारण याचा संपूर्ण परिणाम तुमच्या नात्यावर होते. परिणामी नातं तुटू शकते.
  • पौष्टिक खाणं:पौष्टिक आहार घेतल्यास शरीरातील हॅपी हार्मोन्स अक्टिव्ह होतात. त्यामुळे आनंदी राहण्यासाठी पौष्टिक पदार्थ खाणं गरजेचं आहे. यामुळे नात्यात देखील आनंद दरवळतो. आनंदी मन शांत राहते. यामुळे आपण इतरांनाही प्रेम दोतो.

ABOUT THE AUTHOR

...view details