Headache Relief Tea: डोकेदुखी ही सामान्य समस्या आहे. जी लहानांपासून-वृद्धांपर्यंत कुणालाही होवू शकते. सायनससह अर्धशिशीच्या (मायग्रेन) डोकेदुखीची लक्षणं सारखीच असतात. प्राथमिक अंदाजानुसार जगभरात मायग्रेनचे लाखो रुग्ण आहेत. त्यापैकी बहुतांश महिला आहेत. डोकेदुखीचं कारणं कोणतंही असू द्यात, वेदना प्रचंड असह्य असतात. अशा वेळी हर्बल टी तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळवून देऊ शकते. चला तर जाणून घेऊया अशा कोणत्या हर्बल टी आहेत. ज्यामुळं तुमचं डोकं काही क्षणात बरं होवू शकतं.
- आल्याचा चहा :आलं एक ना अनेक समस्यांवर रामबाण आहे. ही एक औषधी वनस्पती आहे. यामध्ये अनेक आरोग्यदायी रहस्य दळलेले आहेत. आल्यात असलेले दाहक विरोधी गुणधर्म वेदना कमी करण्यास मदत करतात. डोकेदुखी आणि मायग्रेनचा सामना करत असलेल्यांनी आल्यासह काळा चहा पिणं चांगलं आहे. आल्याच्या चहामुळे शरीरातील रक्तवाहिन्यांवरील सूज कमी होते.
- कॅमोमाइल चहा:डोकेदुखी आणि मायग्रेनच्या रुग्णांसाठी कॅमोमाइल चहा उपयुक्त आहे. यात काही घटक असतात जे मज्जातंतूंना आराम देण्यासाठी प्रभावी असतात. सहसा चिंता आणि तणावामुळं नसा संकुचित होतात त्यामुळं मायग्रेनचा त्रास उद्भवतो. यामुळे कॅमोमाइल चहा फायदेशीर आहे. या चहामुळे केवळ वेदना कमी होत नाही तर तणाव आणि निद्रानाशाची समस्या देखील कमी होते.
- लॅव्हेंडर टी :लॅव्हेंडर चहा डोकेदुखी आणि मायग्रेपासून आराम देण्यासाठी उपयुक्त मानला जातो. हा चहा तणाव कमी करतो तसंच पुरेशी झोप घेण्यास मदत करते. तयार लॅव्हेंडर चहा ऐवजी घरगुती लॅव्हेंडर चहा सर्वोत्तम आहे. हा चहा थकवा, श्वासोच्छवासाची समस्या आणि डोकेदुखीसाठी अरोमाथेरपिस्टद्वारे वापरला जाणारा एक उपाय आहे.
- मीठ चहा :चहामध्ये थोडं मीठ टाकल्यास डोकेदुखी आणि मायग्रेनपासून आराम मिळू शकते. यात अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. पचन सुधारण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी मीठाचा चहा पिणं फायदेशीर आहे.
- ग्रीन टी : तुम्ही वर दिलेल्या चहापैकी एकही चहा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता. मायग्रेनपासून मुक्ती मिळवण्याचा सोपा उपाय म्हणजे ग्रीन टी. ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. जे नसा आणि स्थायूंना आराम देतात. ग्रीन टीमुळं चायपचय सुरळीत होते. डोकेदुखी आणि मायग्रेनच्या रुग्णांनी दिवसभरात 2 ते 3 कप ग्रीन टी पिण्याचा सल्ला तज्ञ देतात.
संदर्भ