हैदराबाद Health Damaging Diet :शरीर निरोगी रहावं म्हणून आपण ‘प्रोसेस्ड फुड’ला पसंती देत आहोत. मात्र, आपण घेत असलेला आहार देखील आपल्याला मृत्यूच्या दारात लोटू शकतो, असं नुकत्याच एका संशोधनात समोर आलं आहे. यामुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि मधुमेहासारखे जीवघेणे आजार होऊ शकतात. निरोगी राहण्यासाठी आपला ‘डाएट प्लान’ बदलण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे.
वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासानुसार :आजकाल आपल्या आहारामध्ये भाज्या, फळं, धान्य, चरबी मुक्त किंवा लो-फॅट युक्त दुग्धजन्य पदार्थ असतात. मांस, मासे, धान्य आणि अंडी यांचा यामध्ये समावेश होतो. यामधील फॅट्स, सोडियम आणि साखरेचं प्रमाण प्रक्रिया करून कमी केलं जातं. मात्र, राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासानुसार, ज्या प्रमाणे फॅट्स, सोडियम आणि साखरेच्या अतिसेवनाने शरीराला धोका होण्याची शक्यता असते, त्याच प्रमाणे त्याच्या कमतरतेमुळे देखील आपला जीव जाऊ शकतो.
या घटकांच्या कमी जास्त प्रमाणामुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि टाइप २ मधुमेह होऊ शकतो. यांना कार्डिओमेटाबॅालिक आजार म्हणून ओळखलं जातं. संशोधकांनी राष्ट्रीय आरोग्य आणि पोषण तपासणी सर्वेक्षण तसेच राष्ट्रीय मृत्यूदराच्या आकड्यांचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढला.