महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

केवळ पचनाच्या समस्यांपासून सुटका नाही तर लैंगिकता सुधारण्यासाठी सर्वोत्तम आहे वेलची

वेलची शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते. नियमितपणे वेलची खाल्ल्यानं आरोग्यास कोणते फायदे होतात? ते पाहूया.

Health Benefits Of Cardamom
वेलची (ETV Bharat)

By ETV Bharat Health Team

Published : Nov 22, 2024, 11:02 AM IST

Health Benefits Of Cardamom: वेलचीला 'मसाल्यांची राणी' म्हणतात. त्याची लागवड भारत, श्रीलंका आणि मध्य अमेरिकेत केली जाते. प्राचीन काळापासून मसाले आणि पारंपारिक औषधांमध्ये वेलची वापरली जात आहे. वेलचीमध्ये दालचिनी, जायफळ, लवंगा आणि आले यांसारखेच शरीराचं तापमान वाढवणारे गुणधर्म आहेत. तसंच वेलचीमध्ये नियासिन, खनिजे, रिबोफ्लेविन, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आदी पोषक घटक पुरेशा प्रमाणात आढळतात. त्याचबरोबर पुरुषांची शारीरिक कमजोरी कमी करण्यासाठी वेलची चांगली आहे. तसंच वेलचीचे तेल विविध आजारांवर उपचार करण्यासाठी प्रभावी असल्याचं मानलं जातं. वेलचीचा वापर जेवणाची सुगंध, चव आणि दर्जा वाढवण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर वेलची आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

  • वेलची खाण्याचे फायदे
  • दररोज 2 वेलची खाण्याचे आरोग्य फायदे खालीलप्रमाणे आहेत
  • पचनास मदत करते.
  • श्वासाची दुर्गंधी दूर करते.
  • रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित करण्यासाठी फायदेशीर.
  • रक्तदाब कमी होतो.
  • अँटी-ब्राँकायटिस गुणधर्म
  • रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.
  • मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
  • गर्भधारणेदरम्यान गॅस्ट्रोइंटेस्टाइनल अस्वस्थता कमी करते.
  • पोटाच्या अल्सरवर उपचार करण्यास मदत करते.
  • कर्करोगाशी लढण्यास मदत करते.
  • लैंगिक जीवन सुधारण्यासाठी फायदेशीर
  • ताण-तणाव कमी करते.
  • ओटीपोटात चरबी जमा होण्यापासून रोखण्यासाठी वेलची खूप उपयुक्त आहे.
  • वेलची प्रत्येकासाठी सुरक्षित आहे का? पित्ताशय, यकृत संबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्या आणि त्यावर उपचार घेत असलेल्या लोकांनी वेलची घेण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा. तसंच गर्भवती महिलांनी वेलचीचे जास्त सेवन करू नये. तुम्ही जास्त प्रमाणात वेलचीचं सेवन केलं तर काही लोकांना उलट्या, मळमळ, पोटदुखी, श्वास घेण्यात अडचण यासारख्या समस्या येऊ शकतात.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. मधुमेहाचे रुग्ण काळे चणे खाऊ शकतात का?
  2. उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी आहारात करा 'या' भाज्यांचा समावेश
  3. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याशिवाय मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर ड्रॅगन फ्रुट
  4. हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी बीट फायदेशीर; जाणून घ्या बीट खाण्याचे आरोग्यदायी फायदे

ABOUT THE AUTHOR

...view details