महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

लाल की हिरवे कोणते सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या - GREEN VS RED APPLE

बाजारामध्ये दोन रंगाचे सफरचंद येतात. दोन्ही सफरचंदांपैकी कोणत्या रंगाचं सफरचंद अधिक फायदेशीर ते जाणूया.

Green VS Red Apple
लाल की हिरवे कोणते सफरचंद फायदेशीर (ETV Bharat)

By ETV Bharat Health Team

Published : Oct 25, 2024, 12:37 PM IST

Green VS Red Apple:‘वन ॲपल ए डे, किप डॅाक्टर अवे’ म्हणजेच नियमित एक सफरचंद खा, डॅाक्टरपासून दूर रहा, असं आपण लहान पानापासूनच ऐकलं असेल. कारण, सफरचंद पौष्टिक फळ आहे. नियमित सफचंद खाल्यास अनेक आजारांपासून संरक्षण होते. पंरतु, बाजारामध्ये दोन रंगाचे सफचंद उपलब्ध आहेत. कधी-ना-कधी नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणत्या रंगाचं सफरचंद खायला हवं? कोणतं संफरचंद अधिक फायदेशीर आहेत ते पाहूया.

लाल आणि हिरवे सफरचंद (ETV Bharat)

सफरचंद खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. बाजारामध्ये दोन प्रकारचे सफरचंद असतात. याचे रंग जसे वेगवेगळे आहेत तशी फायद्यामध्येही भिन्नता आहे. सफरचंदाचे आरोग्यदायी फायदे पाहून डॉक्टर देखील आपल्याला नियमित एक सफचंद खाण्याचा सल्ला देतात. सफरचंदामध्ये मिनरल्स, अ‍ॅंटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, खनिजं आणि फायबर सारख्या पोषक घटकांनी समृद्ध आहे.

लाल आणि हिरवे सफरचंद (ETV Bharat)

मार्केटमध्ये लाल रंगाचे सफरचंद मोठ्या प्रमाणात आढळतात. यात भरपूर प्रमाणात अ‍ॅंटिऑक्सिडंट्स आढळतात. यामुळे शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते. तसंच लाल सफरचंद शरीरातील पेशींना ऑक्सिडेटिव्ह नुकसान होण्यापासून थांबवते.

लाल सफरचंद (ETV Bharat)

हिरवं सफरचंद गुणवत्तेच्या बाबतीत लाल सफरचंदापेक्षा थोडं पुढं आहे. हिरव्या सफचंदामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, ई तसंच के जिवनसत्व मुबलक प्रमाणात असतात. याचबरोबर लोह, प्रथिनं आणि पोटॅशियम देखील पुरेशा प्रमाणात आढळते.

हिरवे सफरचंद (ETV Bharat)

हिरवं संफचंद थोडे आंबट -गोड असतात. याचे कवच जाड असते. लाल सफचंदाची साल हिरव्या सफचंदापेक्षा पातळ असते. तसंच हिरव्या संफचंदापेक्षा लाल सफचंद खायला गोड असतो.

लाल सफरचंद (ETV Bharat)

शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लाल सफचंद फायदेशीर आहे. तसंच बद्धकोष्टतेची समस्या दूर करण्यासाठी लाल सफचंद अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर उपाशी पोटी सफरचंद खाल्यास शरीरावरील सूज कमी होते असं म्हटलं जाते.

लाल सफरचंद (ETV Bharat)

वजन कमी करणाऱ्यांसाठी हिरव्या सफरचंदापेक्षा लाल सफरचंद फायदेशीर आहे. शरीर डिटॉक्स करण्यासाठी लाल सफरचंद चांगलं आहे.

हिरवे सफरचंद (ETV Bharat)

मधुमेहाच्या रुग्णांसाठी हिरवं सफचंद फायदेशीर आहे. मधुमेहाचे रुग्ण दोन्ही रंगाचे सफरचंद खावू शकतात.

लाल आणि हिरवे सफरचंद (ETV Bharat)

लाल आणि हिरवे दोन्ही सफरचंद आपरोग्याच्या दृष्टीने चांगले आहेत. तुम्ही दोन्ही सफचंद खावू शकता. कोणत्या रंगाचे सफचंद खावं हे आपल्यावर डिपेंड आहे. दोघांचेही निराळे फायदे आहेत.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

पौष्टिक घटकांनी समृद्ध आहे ‘हे’ फळ; मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान

नैसर्गिक प्रसूतीसाठी फायदेशीर आहेत ‘या’ बिया; फायदे वाचून व्हाल हैरान

ABOUT THE AUTHOR

...view details