हैदराबाद Benefits Of Eating Garlic स्वयंपाक घरातील हा घटक तुमच उच्च कोलेस्टेरॉल कमी करु शकतो. धावपळीच्या जीवनात अनेकांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामध्ये आहाराची अयोग्य पद्धतीची भर पडल्यामुळे अनेक समस्या उत्पन्न होत आहेत. अनेक सायलंट किलर आजार चोरपावलांनी शरीरात शिरकाव करत आहेत. बरेच व्यक्ती पोटाशी संबंधित आजार, मधुमेह, हृदयविकार तसंच बद्धकोष्टाच्या आजारांनी त्रस्त आहेत. जनसामान्याना भेडसवणारी सामान्य समस्या म्हणजे उच्च कोलेस्टेरॉल. आजकाल बहुतेक लोकं उच्च कोलेस्टेरॉलने त्रस्त आहेत. कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्याकरिता अनेक जण ना-ना प्रकारचे उपाय करतात. परंतु आपल्या स्वयंपाक घरात असलेला एक घटक उच्च कोलेस्टेरॉलची समस्या दूर करु शकतो हे अनेकांनी माहिती नाही. चला तर मग जाणूया स्वयंपाक घरातील या घटका बद्दल जे तुमचं उच्च कोलेस्टेरॉल पातळी कमी करु शकतं.
तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही तुमच्या कोलेस्टेरॉलची पातळी अतिशय सहज पद्धतीने कमी करू शकता? कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी रोज कच्च्या लसणाचं सेवन करणं पुरेसं आहे. लसूण अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. शरीरातील चरबी लवकर वितळण्यास मदत होते असं मत डॉक्टर आणि आहारतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
"ईटीव्ही भारतशी बोलताना हैदराबादचे आयुर्वेदिक डॉक्टर नहुष कुंटे म्हणाले की, जेवण करण्यापूर्वी लसणाच्या दोन पाकळ्या चघळणं आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकतात. यामुळे गंभीर आजारांचा धोका कमी होऊ शकतो. लसूण उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करतं. तसंच कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यापासून ते लठ्ठपणा कमी करण्यासाठी लसूण उपयुक्त आहे.''
खाण्याआधी लसणाच्या दोन पाकळ्या चावून खाव्यात
लसूण हा रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्याचा चांगला स्रोत मानला जातो. लसणामध्ये सल्फाइट संयुगे असतात. त्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत होते. तसंच हे हृदयाशी संबंधित समस्या टाळण्यास देखील उपयुक्त आहे. त्याचबरोबर लसूणामध्ये व्हिटॅमिन सी पुरेसा असतो.
लसणामध्ये नैसर्गिक प्रतिजैविक गुणधर्म असतात, यामुळे विविध संक्रमणांशी लढण्यास मदत करतात. लसूण सर्दी आणि खोकल्यापासून आराम देण्यास देखील मदत करू शकते. त्यामुळे पावसाळ्यात आणि हिवाळ्याच्या काळात लसूणाचा आहारात समावेश करा.
- लसूण खाण्याचे फायदे