Cleaning Diyas For Diwali:दिवाळीमध्ये सर्वत्र रोषणाई पाहायला मिळते. घराचा प्रत्येक कोपरा दिव्यांच्या लख्ख प्रकाशानं उजळून निघतो. परंतु मागच्या दिवाळीत वापरलेले दिवे आपण फेकून देत नाही. ते पेपरमध्ये गुंडाळून किंवा पिशवीमध्ये जपून पुढच्या वर्षी वापरायच्या उद्देशानं साठवून ठेवतो. हे दिवे तेलानं चिकट झालेले असतात. अशात यांना स्वच्छ करण फार कठीण काम असते. तुम्ही देखील जुने दिवे वापरता का? काळजी करु नका. कारण आम्ही तुमच्याकरिता काही टिप्स घेऊन आलोय. या टिप्स फॉलो केल्यास दिवे नव्यासारखे चमकू लागतील.
- बेकिंग सोडा, लिंबू आणि डिटर्जंट पावडर: गेल्या वर्षी वापरलेले दिवे पेपरने चांगले पुसून घ्या. यानंतर एक मोठं भांडं घ्या त्यात पाणी ओतून गरम करा. त्यात दोन चमचे बेकिंग सोडा, दीड चमचा डिटर्जंट पावडर आणि लिंबाचा रस तसंच लिंबाची साल टाका. आता यात दिवे घाला आणि 5 ते 10 मिनिटं चांगले उकळा. जसजसे दिवे उकळू लागणार तसतसे दिव्यातील तेल कमी होईल. आता गॅस बंद करा आणि तासभर दिवे तसेच भिजत ठेवा. यानंतर पाण्यानं दिवे धुवून घ्या. टिश्यू पेपर किंवा सुती कापडानं दिवे पुसून घ्या, असं केल्यास दिवे नवे दिसू लागतील.
- व्हिनेगर: एका भांड्यामध्ये एक चमचा रॉक मीठ आणि तीन चमचे व्हिनेगर एकत्र मिसळा. आता तयार मिश्रण दिव्यांवर लावा आणि तासभर भिजू ठेवा. नंतर पाण्यानं स्वच्छ धुवा आणि सुती कपडानं पुसून द्या. जेणेकरून ते नवीन दिसतील.
- डिटर्जंट पावडर + व्हिनेगर:एकदा वापरलेले दिवे साफ करणं अवघड काम आहे. परंतु तुम्हाला ते नव्यासारखे चमकवायचे असतील तर तुम्ही अर्धा कप पाण्यामध्ये एक चमचा डिटर्जंट पावडर आणि चिमूटभर व्हिनेगर मिसळा. हे मिश्रण दिव्यांवर लावा आणि टुथब्रशने हलक्या हातानं घासून पाण्यानं धुवा.
- नवीन खरेदी केलेले दिव्यांना जास्त तेल लागतो. त्यामुळे नवीन दिवे खरेदी केल्यानंतर ते रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी दिवे धुऊन उन्हात वाळवावेत असं केल्यानं दिवे जास्त तेल काढणार नाहीत.
- नवीन खरेदी केलेल्या दिव्यांना जास्त तेल लागतं. त्यामुळे नवीन दिवे खरेदी केल्यानंतर ते रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी दिवे धुऊन उन्हात वाळवा. असं केल्यानं दिव्यांना जास्त तेल लागणार नाही.
- नवीन दिवा लावल्यावर त्यातून तेल गळत असेल तर दिवा लावताना त्याच्या खाली विळ्याचे पान ठेवा असं केल्यानं ग्राउंड ऑइल चिकटणार नाही.