महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

यंदा साजरी करा अशी आगळी-वेगळी दिवाळी - DIWALI 2024

Celebrate Eco Friendly Diwali: यंदा अशा प्रकारे करा इको फ्रेंडली दिवाळी साजरी. यामुळे पर्यावरण आणि तुमचं आरोग्य चांगलं राहिल.

Celebrate Eco Friendly Diwali
इको फ्रेंडली दिवाळी (ETV Bharat)

By ETV Bharat Lifestyle Team

Published : Oct 24, 2024, 3:53 PM IST

Celebrate Eco Friendly Diwali: दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्याची पद्धतशीर प्लानिंग तुम्ही करत असणार. मात्र, अनेकदा दिव्यांचा हा सण साजरा करताना पर्यावरणाचा समतोल राखण्याचा विसर आपल्याला पळतो. वर्षातून एकदा येणाऱ्या या सणादरम्यान मौज नाही करणार तर काय? असा विचार सर्व करतात. परंतु, आपण आपल्या उत्साहासोबतच पर्यावरणाचा समतोल राखू शकतो. त्यासाठी दिवाळी साजरी करताना थोडे-फार बदल करावे लागतील. चला तर जाणून घेऊया इको फ्रेंडली दिवाळी कशी साजरी करू शकतो.

गिफ्ट कार्ड (Getty Images)
  • इको फ्रेंडली भेटवस्तू: दिवाळीमध्ये प्रत्येक जण आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देतात. भेटवस्तू देतांना तुम्ही इको फ्रेंडली साहित्यांपासून बनलेल्या वस्तूंचा समावेश आपल्या बकेटलिस्टमध्ये अ‍ॅड करू शकता. भेटवस्तू पॅक करण्यासाठी प्लास्टिक गिफ्ट रॅपर्सचा वापर टाळा. याऐवजी कापडी पिशव्या किंवा कागदी वेष्टणंचा वापर करा. तसेच तुम्ही काही वनस्पती किंवा गिफ्ट कार्ड भेट म्हणून देवू शकता.
इको फ्रेंडली भेटवस्तू (ETV Bharat)
  • फटाके फोडू नका: दिवाळीमध्ये एअर क्लाविटी इंडेक्स मोठ्या प्रमाणात खराब होतो. फटाक्यांच्या धूरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. फटाक्यांमध्ये बेरियम, सल्फर, पोटॅशियम, अल्युमिनियम, क्लोरिन टायटॅनियम, असे आरोग्यास घातक रासायनिक घटक असतात. यामुळे त्वचेसंबंधित आजार, फुफ्फुसाचा त्रास तसंच घसा आणि नाकाची खवखव अशा समस्या होतात. यामुळे फटाके फोडणे टाळा. फटाके फोडायचे झाल्यास पर्यावरण पूरक फटाक्यांना पहिली पसंती द्या.
फटाके (ETV Bharat)
  • इको फ्रेंडली रांगोळी: दिवाळीमध्ये रांगोळी घालतांना नैसंर्गिक रंगाचा वापर करा. कारण कॅमिलयुक्त रांगोळी पर्यावरण आणि आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. रांगोळी ऐवजी तुम्ही फुलांच्या पाकळ्या, तांदूळ आणि हळदीपासून तयार केलेली रांगोळी वापरू शकता. हे आरोग्यासाठी उत्तम तर आहेच, तसंच पर्यावरणासाठी पूरक देखील आहे.
इको फ्रेंडली रांगोळी (ETV Bharat)
  • घरी बनवलेली मिठाई: बाजारामधुन खरेदी केलेल्या मिठाईमध्ये कृतिम कलर, प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि मोठ्या प्रमाणात साखर वापरली जाते. यामुळे तुम्हाला आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावं लागू शकते. यामुळे तुम्ही मिठाई घरी तयार करा आणि मिठाईचा आस्वाद घ्या. आपल्या प्रियजनांना देखील मिठाई घरी तयार करण्याच सल्ला द्या. आमुळे तुमचं आणि तुमच्या प्रियजनांचं आरोग्य ठणठणीत ठेऊ शकाल.
घरी बनवलेली मिठाई (Getty Images)
  • मातीच्या पणत्या:या दिवाळीला तुम्ही प्लास्टिक पासून तयार विद्युत दिव्यांऐवजी मातीचे दिवे वापरा. मातीच्या पणत्या वापरल्यास तुम्हीला बील देखील कमी येईल.
मातीच्या पणत्या (ETV Bharat)

ABOUT THE AUTHOR

...view details