महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण किती असावं? सीएसआयची नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी - New guidelines on blood cholesterol - NEW GUIDELINES ON BLOOD CHOLESTEROL

CSI Issued Guidelines On Blood Cholesterol : कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेनं डिस्लिपिडेमिया (रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे) आजारासंबंधी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

CSI issued guidelines to help prevent abnormal fluctuations in blood cholesterol levels
कोलेस्ट्रॉलचं 'इतकं' प्रमाण म्हणजे धोक्याची घंटा; सीएसआयची नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 5, 2024, 12:23 PM IST

हैदराबाद CSI Issued Guidelines On Blood Cholesterol : भारतीयांच्या शरीरात एकूण कोलेस्ट्रॉलची पातळी किती असावी, या संदर्भात कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेनं गुरुवारी (4 जुलै) मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. डिस्लिपिडेमियामध्ये उच्च एकूण रक्त कोलेस्ट्रॉल, उच्च एलडीएल-कोलेस्ट्रॉल (बॅड कोलेस्ट्रॉल ), उच्च ट्रायग्लिसराइड्स आणि कमी एचडीएल-कोलेस्ट्रॉल यांचा समावेश होतो. त्यामुळं हृदयविकाराचा झटका, पक्षाघात यांसारखे हृदयाशी संबंधित आजार होतात.

याविषयी अधिक माहिती देत सीएसआयचे अध्यक्ष डॉ. प्रतापचंद्र रथ म्हणाले की, "कोलेस्ट्रॉल हे सायलंट किलरसारखं आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या समस्यांप्रमाणे त्याची लक्षणं लवकर दिसून येत नाहीत. मात्र, मार्गदर्शक तत्त्वांच्या मदतीनं रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते", असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सीएसआयनं जारी केलेली नवीन मार्गदर्शक तत्त्वे :

  1. हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असलेल्या किंवा रक्तातील कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी (हायपरकोलेस्टेरोलेमिया) असलेल्या लोकांनी त्यांचे प्रथम लिपिड प्रोफाइल 18 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयात केले पाहिजे.
  2. सामान्य लोकसंख्येमध्ये, कमी जोखीम असलेल्या व्यक्तींनी LDL-C पातळी 100 mg/dL आणि नॉन-HDL-C पातळी 130 mg/dL पेक्षा कमी राखण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे.
  3. उच्च जोखीम असलेल्या लोकांनी (मधुमेह, उच्च रक्तदाब) LDL-C पातळी 70 mg/dL आणि नॉन-HDL-C पातळी 100 mg/dL च्या खाली ठेवण्याची काळजी घ्यावी.
  4. ज्यांना सर्वाधिक धोका आहे (स्ट्रोकचे बळी, हृदयविकाराचा झटका, दीर्घकालीन किडनी रोगग्रस्त) त्यांनी LDL-C पातळी 55 mg/dL आणि नॉन-HDL-C पातळी 85 mg/dL पेक्षा कमी ठेवण्याची काळजी घ्यावी.
  5. अन्नामध्ये साखर आणि कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणात घ्यावीत.
  6. हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी योग आणि व्यायाम करावा.

(Disclaimer- वाचकांना ही केवळ आरोग्यासाठी दिलेली माहिती आहे. मात्र, त्याचा उपयोग करताना डॉक्टरांनी दिलेला वैद्यकीय सल्ला घ्यावा)

हेही वाचा -

  1. Corn Benefits : कोलेस्ट्रॉल कमी करण्यापासून ते केस गळती नियंत्रित करण्यापर्यंत, जाणून घ्या मक्याच्या कणसाचे फायदे
  2. Cholesterol Reduce Dry Fruit : कोलेस्ट्रॉलची समस्या असलेले लोक खाऊ शकतात हे ड्राय फ्रूट्स
  3. REDUCE CHOLESTEROL : कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी जाणून घ्या कोणत्या गोष्टी टाळणे चांगले आणि कोणत्या ठरतील फायदेशीर

ABOUT THE AUTHOR

...view details