नवी दिल्ली- काही लशींमुळे रक्तवाहिन्यांत गाठी निर्माण होण्याचा विकार होत ( Thrombosis Thrombocytopenia Syndrome TTS) असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. राजीव जयदेवन यांनी दिली. असे असले तरी कोरोना लशीमुळे अनेकांचे मृत्यू टळण्यास मदत झाल्याचे डॉ. जयदेवन यांनी सांगितलं. ते नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशनचे ( आयएमए) सह-अध्यक्ष आणि केरळमधील टास्क फोर्सचे सदस्य आहेत.
डॉ. राजीव जयदेवन म्हणाले, " काही प्रकरणांमध्ये लस घेतलेल्या व्यक्तींमध्ये रक्तवाहिन्यांत गाठी निर्माण होण्याचा विकार ( TTS) झाला. अशा गाठी मेंदुच्या रक्तवाहिन्यांसह इतर कुठेही होऊ शकतात. यामध्ये पेशींची संख्यादेखील कमी होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार ( WHO )बहुतांश अशी प्रकरणे ही अॅडेनोव्हायरस व्हेक्टर लसीच्या संदर्भात आहेत. अशी प्रकरणे खूप दुर्मीळ आहेत. मात्र, त्याचा प्रतिकारक्षमतेवर गंभीर परिणाम होत असल्याचे काही अहवाल विविध संशोधनपत्रिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत."
लसीमुळे विकार होत असल्याची कंपनीची कबुली-अॅस्ट्राझेनेका औषधी कंपनीकडून कोव्हिशिल्ड आणि व्हॅक्सजेव्हरिया या लशींचे उत्पादन घेण्यात येते. या कंपनीनं लशींमुळे काही दुर्मीळ प्रकरणात टीटीएसचा विकार होत असल्याचं नुकतंच कबुल केलं.इंग्लंडच्या काही माध्यमांच्या वृत्तानुसार अॅस्ट्राझेनेका कंपनीनं टीटीएसचा विकार होत असल्याचं न्यायालयातील सुनावणीत कबूल केलं. अॅस्ट्राझेनेका ही लस ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या सहाय्यानं विकसित करण्यात आली आहे.
सीरमनंही घेतलं कोव्हिशील्डचं उत्पादन-पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनदेखील ऑक्सफोर्डच्या संशोधनानुसार कोव्हिशिल्डचे उत्पादन घेतले. मात्र, त्यासाठी एमआरएनएचा वापर केला नाही. एमआरएनएमध्ये व्हायल व्हेक्टरचा वापर करण्यात येतो. याच संशोधनाचा वापर एबोला विषाणुविरोधात तयार करण्यात आलेल्या लशींमध्ये करण्यात आला. कोरोना लशींमुळे रक्त गोठण्याचा विकार होत असल्याच्या माहितीवर सीरमची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
आरोग्य संघटनेनं अहवालात काय म्हटलंय?कोरोनाच्या लशीनंतर दुष्परिणाम म्हणून टीटीएसचं प्रमाण वाढल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं २०२३ मधील एका अहवालात नमूद केलं होतं. टीटीएस हा गंभीर आणि प्राणघातक दुष्परिणाम आहे. त्याबाबत जनजागृती वाढविण्याकरिता जागतिक आरोग्य संघटनेनं अंतरिम आपत्कालीन मार्गदर्शनाची घोषणा केली होती. जेणेकरून कोरोना लस उत्पादकांना टीटीएस प्रकरणांचे व्यवस्थापन करण्यात मदत होईल, असे आरोग्य संघटनेनं म्हटलं होते.
आरोग्यमंत्र्यांचा काय आहे दावा ?केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी मार्च २०२४ मधील एका कार्यक्रमात कोरोना लशीचा दुष्परिणाम होत नसल्याचं म्हटलं. त्यांनी म्हटलं होतं की, आयसीएमआरनं कोरोना लशीसंदर्भात सविस्तर अभ्यास केला. त्यानुसार ह्रदयविकाराचा झटका येण्याला कोरोना लस कारणीभूत नाही. त्यासाठी मद्यपानासह वैयक्तीक जीवनशैली अशी कारणे आहेत. कोणाला झटका आला तर त्यासाठी त्यांना कोरोना लस जबाबदार असल्याचं वाटतं."
हेही वाचा-
- चीननं पुन्हा धाकधूक वाढवली; जानेवारीत होऊ शकते कोरोनाच्या संसर्गात वाढ
- कोरोना वाढतोय. कशी काळजी घ्याल, जाणून घ्या आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला काय?