महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

सावधान! तुम्ही सुद्धा थेट गॅस फ्लेमवर पोळी शेकता का? पडू शकतं महागात - Can Roti Cause Cancer

Can Roti Cause Cancer : चपाती थेट गॅसच्या फ्लेमवर शेकल्यास कॅन्सर होतो का? अशी शंका अनेकांना असते. परंतु हे खरं आहे का? याबाबत जाणून घेऊ या मागील वैज्ञानिक कारण आणि करून घेऊ आपल्या शंकेचं निरसन.

Can Roti Cause Cancer
गॅस फ्लेमवर पोळी शेकल्यास कॅन्सर होवू शकते (ETV Bharat)

By ETV Bharat Health Team

Published : Sep 9, 2024, 5:29 PM IST

हैदराबाद Can Roti Cause Cancer : चपात्या भारतीय आहाराचा भाग आहेत. दक्षिणेत ते खाण्याचं प्रमाण थोडं कमी असलं तरी तेथे चपाती खाल्ली जाते. उत्तर भारतीय बहुतांश लोक चपात्या खातात. महत्वाचे म्हणजे चपात्या तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्या तव्याऐवजी थेट गॅसच्या फ्लेमवर भाजणे. हा प्रकार बऱ्याच प्रदेशात सामान्य आहे. चपात्या थेट गॅस फ्लेमवर भाजल्यास किंवा शेकल्यास टम्म फुगते परंतु या चपातीमुळे कर्करोग होऊ शकतो. तसंच शरीराच्या विविध अंगावरही परिणाम होऊ शकतो. असं नुकत्याच केलेल्या एका संशोधनात समोर आलं आहे.

अभ्यासानुसार :2018 मध्ये जर्नल ऑफ फूड सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं, की चपाती किंवा कोणतंही खाद्यपदार्थ थेट गॅस फ्लेमवर शेकल्यास कर्करोगाचा धोका वाढतो. 'Formation of Polycyclic Aromatic Hydrocarbons (PAHs) in Food while Cooking' या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. हा अभ्यास डॉ. जे. एस. ली, जे.एच. किम, वाय. जे. ली यांनी केला होता.

डॉक्टरांचे म्हणणं आहे की, उच्च तापमानात स्वयंपाक केल्यानं ॲसिलॅमाइड, हेटरोसायक्लिक अमाइन (एचसीए) आणि पॉलीसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (पीएएच) सारखी कर्करोग निर्माण करणारी संयुगे तयार होतात. याशिवाय थेट गॅस फ्लेमवर शेकल्यास कार्सिनोजेन्स वाढतात. यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी डॉक्टरांनी काही टिप्स दिल्या आहेत त्या फॉलो केल्यास तुम्हालाही त्याचा फायदा होईल.

कर्करोगाचा धोका कसा कमी करायचा?

  • चपाती जास्त जळणार नाही याची काळजी घ्या.
  • स्टोव्हवर किंवा गॅस फ्लेमवर थेट शिजवलेले पदार्थ कमी खाणं चांगले.
  • चपात्या थेट गॅस फ्लेमवर शिजवण्याचं प्रमाण कमी करा. गॅस फ्लेमवर शिजवलेल्या चपात्या शक्यतो कमी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्याऐवजी, जर तुमचा आहार संतुलित असेल तर ते खूप चांगले आहे.

चपात्या तव्यावर शेका:चपात्या थेट गॅस फ्लेमवर शिजवण्याऐवजी तव्यावर शेकणं अधिक चांगलं. असं केल्यानं पॅन अधिक उष्णता शोषून घेते आणि कमी उष्णतेमध्ये चपात्या बनवण्यास मदत होते. परिणामी, ॲसिलॅमाइड, हेटरोसायक्लिक अमाइन (एचसीए) आणि पॉलीसायक्लिक हायड्रोकार्बन्सचे उत्पादन रोखले जाते.

तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा : तुम्ही भरपूर चपात्या खात असाल तर तुमच्या आहारात अँटिऑक्सिडंटनं समृद्ध फळं आणि भाज्यांचाही समावेश करा. हे मुक्त रॅडिकल्स ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात. आणि कर्करोग टाळण्यासाठी मदत करतात. कर्करोग टाळण्यासाठी डॉक्टर या पद्धतींचा अवलंब करण्याचा सल्ला देतात.

अधिक माहितीकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC8199595/

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

जेवल्यानंतर टाळा ‘या’ गोष्टी? पडेल महागात - After Meals Habit

मोबाइलच्या अतिवापराने कर्करोग होतो का? जागतिक आरोग्य संघटनेचा खुलासा - Brain Cancer

ABOUT THE AUTHOR

...view details