Bra Guide For Different Dress: विविध ऑकेशन्समध्ये कपडे परिधान करताना ट्रेंडिंग फॅशनकडे तरुणींचा कल असतो. मेकसोबतच वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करायला त्यांना आवडतात. पार्ट्या आणि समारंभाकरिता बॅकलेस, शोल्डर फ्री, टाईट फिट कोट, सूट, हलके कपडे किंवा ट्रेंडीड्रेस परीधान करण्यास त्या प्राधान्य देतात. परंतु, संबंधित कपड्यांशी जुळणारी ब्रा निवडण्यात त्या मागे पडतात. ड्रेसखाली योग्य ब्रा नसल्यास तुमचा लूक चेंज होतो. यामुळे चार-चौघात फजीती होण्याची शक्यता असते. अशा, समस्या टाळण्यासाठी योग्य ब्रा निवडण्याचा सल्ला तज्ञ देतात. चला तर पाहूया ड्रेसनुसार कोणती ब्रा निवडावी.
- टी-शर्ट ब्रा:अनेक मुली लग्न आणि शुभ कार्याप्रसंगी साडी नेसतात. कारण अशा कार्यक्रमांमध्ये साडी घातल्यास त्यांच सौंदर्य आणखी खुलून दिसतं. साडी नेसल्यास तुम्ही टी-शर्ट ब्रा घाला. कारण टी-शर्टी ब्रा आरामदायी आहे तसंच योग्य आहे. मऊ पॅडिंगसह हे तुम्हाला चांगला आकार प्रदान करते. शिवाय टी-शर्ट ब्रामध्ये अनावश्यक ब्रा लाईन्स नसतात त्यामुळे कपड्यांमधून ब्राचा आकार दिसत नाही.
- बालकोनेट ब्रा: रुंद आणि चौकोनी नेक असलेले कपडे किंवा ब्लाऊज घातल्यास तुम्ही सामान्य अंडरगार्मेंट घालू नये. कारण यामुळे ब्राच्या पट्ट्या आणि रेषा उमटून दिसतात. यामुळ रूंद आणि चौकोनी नेकच्या कपड्यांवर बालकोनेट ब्रा घालण्यास प्राधान्य द्या. हे केवळ आरामदायकच नाही तर, बालकोनेट ब्रा ब्रेस्टला चांगल्या प्रकारे सपोर्ट देते. त्यामुळे तुम्ही स्टायलिश दिसता.
- ऑफ-शोल्डर किंवा कन्वर्टिंबल ब्रा:पार्ट्यांना जाताना ट्रेंडी दिसण्यासाठी बरेच लोक बॅकलेस आणि शोल्डर फ्री आउटफिट्स घालतात. अशावेळी आपण ऑफ-शोल्डर किंवा कन्वर्टिंबल ब्रा घातल्यास आपल्याला ब्राचे पट्टे दिसण्याची काळजी करावी लागत नाही. यातील सिलिकॉन टेपिंग त्वचेला धरून ठेवते आणि ड्रेसला छान लुक देते.
- व्ही शेप, डीप नेक ड्रेस आणि ब्लाउज घातल्यावर प्लंज ब्रा घालणे चांगले.
- व्यायाम करताना स्पोर्ट्स ब्रा आरामदायक असतात. ते घाम शोषून घेतात आणि व्यायाम करण्यासाठी अतिशय योग्य असतात.
- ज्यांना फंकी टँक टॉप्स, वाई स्टाइल, क्रॉस ओव्हर टॉप्स आवडतात त्यांच्यासाठी रेसर ब्रा सर्वोत्तम पर्याय आहेत. यामुळे स्ट्रॅप स्लिपिंग आणि ब्रा दाखविण्यासारख्या समस्या नाहीत.