हैदराबाद Benefits of soaked coriander water :भारतीय जेवणातील रुटकरता वाढवणारा एक घटक म्हणजे धणे. कोथिंबीर, धणे किंवा धणे पावडर या सर्व पदार्थांचा वापरामुळे जेवन रुचकर होते. परंतु या व्यतीरिक्त धणे आरोग्यासाठी देखील अत्यंत उपयुक्त आहेत. धणे फ्लेवोनोइड, बी कॅरोटीनॉइड, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, पॉलीफेनॉल, आयर्न यासारख्या पोषक घटकांनी परिपूर्ण आहेत. धण्यांमुळे कोणते आरोग्यवर्धक फायदे होतात आणि त्याचा वापर कसा करावा याबद्दल माहिती पाहूया.
आहारतज्ज्ञांच्या मते :प्रसिद्ध आहारतज्ञ श्रीमती अनुमापा गिरोत्रा यांच्या मते, सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी धण्याचं पाणी प्यायल्यास आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. धण्यांमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. कोथिंबीरीची पानं आणि बिया या सर्वांचे स्वतःचे फायदे आहेत. सकाळी रिकाम्या पोटी धण्यांच पाणी प्यायल्यानं शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. पचनशक्ती वाढवते, वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे आणि मानवी शरीराला डिटॉक्सिफाय करते.
रोग प्रतिकारशक्ती वाढवणारा: रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यास कोणत्याही रोगाशी लढण्यास मदत मिळते. धणे हा एक उत्तम नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवणारा पदार्थ आहे. धणे शरीराला मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतं. धण्यांच्या पाण्यात कोविड आणि फ्लू सारख्या धोकादायक विषाणूंशी लढण्याची ताकद असते.
केसांची मजबूती: धण्यांमध्ये व्हिटॅमिन-के, व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-ए भरपूर प्रमाणात असते. केस मजबूत होण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. एक ग्लास पाण्यात धणे भिजवून प्यायल्यानं केस मुळांपासून मजबूत होतात आणि केस गळणे आणि तुटण्याची समस्या कमी होते. कोथिंबीर हेअर मास्कचेही काम करते.
पचन समस्या: धण्यांचं पाणी प्यायल्यानं पचनाच्या समस्याही कमी होतात. सकाळी धण्याचं पाणी प्यायल्यास पचनक्रिया सुधारते. पचनाचे कार्य देखील जलद करते.