नवी दिल्ली-आधारकार्डचा हा उपयोग हा बँक खात्यांना जोडण्याबरोबरच सीम कार्ड खरेदी करण्यासाठी होतो. या चांगल्या सुविधेमुळे नागरिकांना फायदा होत आहे. पण, तुम्हाला माहित आहे का? त्याचा गैरवापरदेखील होऊ शकतो. अनेकदा आधार कार्डचा गैरवापर करून सीमकार्ड घेणाऱ्या टोळ्यांचा पोलिसांनी पर्दाफाशदेखील केला. तर चला जाणून घेऊ, तुमच्या आधार कार्डचा गैरवापर कसा थांबवायचा?
आपल्या नावानं कोणी सीमकार्ड खरेदी करण्यासाठी आधार कार्डचा वापर केला तर...देशात सायबर गुन्ह्यांचं वाढलेले प्रमाण आणि मोबाईल क्रमांकाला जोडलेली बँक खाती यामुळे तुम्ही अडचणीत सापडण्याची दाट शक्यता असते. तुमचा आधार कार्ड हे मोबाईल क्रमांकाबरोबर लिंक असणं आवश्यक आहे. ते असेल तरच तुम्हाला आधार कार्डचा ओटीपी मिळू शकणार आहे. आधार कार्डचा वापर कोणत्या मोबाईल क्रमांकासाठी वापरला जातोय, हे ओटीपीनं कळू शकते. अनेकवेळा सायबर गुन्हेगार सीमकार्डचा वापर करून गुन्हे करतात. आधारकार्ड करून दुसऱ्याच्या नावे सीमकार्ड खरेदी करतात.