मुंबई - ( भारत ) - अलिकडेच प्रदर्शित झालेल्या '12th फेल' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत असलेला अभिनेता विक्रांत मॅसी आणि त्याची पत्नी शीतल ठाकूर यांनी त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. यावेळी शीतलने आनंद आणि प्रेमाने भरलेल्या त्यांच्या खास वाढदिवसाची एक झलक शेअर केली आहे.
शीतल ठाकूरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर सुंदर सजवलेल्या केकचा फोटो शेअर केल आहे. त्यातील एका केकवर या सुंदर डजोडप्याचे नाव लिहिले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, "लग्नाला दोन वर्षे! आम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा." विशेष म्हणजे अलिकडे 7 फेब्रुवारी रोजी दोघांच्या घरी पहिल्यांदाच पाळणा हालला होता.
घरी मुलगा जन्माला आल्याचा आनंद त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त करताना लिहिले, " 07.02.2024. या दिवशी आम्ही एक बनलो. आमच्या घरी लेकाचं आगमन झालंय हे सांगताना आनंद आणि प्रेमाने मन भरुन गेले आहे. शीतल आणि विक्रांतवर प्रेम असू द्या."
यापूर्वी विक्रांतने तो आणि त्याची पत्नी शीतल यांना पहिल्या अपत्याची प्रतीक्षा असल्याचे लिहिले होते. यासाठीही त्याने एक क्रिएटिव्ह पोस्ट शेअर केली होती. मुलाचा जन्म झाल्यानंतर विक्रांतने डॉक्टरांचे मनापासून आभार मानेल. आमच्या आयुष्यात आनंद देण्याचे काम या देवदूतांनी केल्याचं तो म्हणाला. बाळंतपणात काही अडचणी होत्या पण त्यावर मात करत डॉक्टर्सनी आम्हा पती पत्नीला आनंद दिल्याचं त्यानं एक व्हिडिओ शेअर करत सांगितले होते.