शिर्डी ( अहमदनगर ) - बहुचर्चित 'छावा' सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना शिर्डीला साईमंदिरात पोहोचले होते. साईंच्या मध्यान्ह आरतीनंतर दोघांनी साई समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. 'छावा' चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यावेळी आपल्या टीमसह साईदर्शनासाठी आले होते. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देशभर विविध राज्यात फिरत असलेली ही टीम रिलीजपूर्वी साई दरबारात दाखल झाली.
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'छावा' सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारीला रिलीज होतोय. विकी कौशलनं या सिनेमात मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारलीय तर रश्मिका मंदाना सिनेमात महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी छावाच्या संपूर्ण टीमनं कंबर कसल्याच दिसून येत असून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना प्रेक्षकांशी संवाद साधत आहेत आणि देव दर्शन करताना दिसून येत आहेत.
रश्मिकाच्या पायाला दुखापत झाली असतांनाही ती आणि विकी कौशल शिर्डी साई मंदिरात पोहचले. या वेळी पूर्ण रस्त्यात विकीनं रश्मीचा हात पकडत तिला आधार देताना दिसला. अलिकडेच विकी कौशलनं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्णमंदिरात तो पोहोचला होता. त्यानंतर आज या विकी आणि रश्मिकाता या जोडीनं शिर्डीत येवून साई दर्शन घेतलंय.