मुंबई - Horror movies and web series: हॉरर चित्रपट आणि वेब सीरीज अनेकजण पाहातात. अनेकदा असं होतं की, एखादी सीरीज किंवा चित्रपट पाहिल्यानंतर झोप लागत नाही. काही काही चित्रपट आणि वेब सीरीज इतक्या भयावह असतात की तुम्ही एकट्यात पाहू शकत नाही. काही चित्रपट आणि वेब सीरीजच्या कथा सत्या गोष्टींवर आधारित असतात तर काही काल्पनिक. आज आम्ही तुम्हाला अशाच काहीबद्दल मालिका आणि चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही एकट्यानं पाहू शकणार नाहीत, जर पाहिल्यास तुमची झोप उडून जाऊ शकते.
घोल : राधिका आपटे, मानव कौल आणि रोहित पाठक अभिनीत 'घोल' 2018 रोजी प्रदर्शित झाला होता. ही वेब सीरीज खूप थरारक आहे. 'घोल' नेटफ्लिक्सवर तुम्ही पाहू शकता. राधिका आपटे आणि मानव कौल यांच्याशिवाय महेश बलराज आणि रत्नावली भट्टाचार्जी यांसारख्या दिग्गज कलाकार देखील या सीरीजमध्ये दिसले आहेत.
वीराना :'वीराना' हा बॉलिवूडमधील सर्वात भयानक चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट 1988 मध्ये रिलीज झाला होता. श्याम रामसे आणि तुलसी रामसे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात जास्मिनची मुख्य भूमिका होती. याव्यतिरिक्त राजेश विवेक उपाध्याय, साहिला चड्ढा, हेमंत बिरजे, कुलभूषण खरबंदा आणि गुलशन ग्रोवर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट तुम्ही यूट्यूबवर मोफत पाहू शकता.