महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'तौबा तौबा' डान्स रीलला 58 मिलियन मिळाले व्ह्यूज, विकी कौशलनं केलं कौतुक - tauba tauba dance - TAUBA TAUBA DANCE

Tauba Tauba Dance Reel: 'तौबा तौबा' डान्सचा रील हा सोशल मीडियावर प्रचंड वेगानं व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या मुलांबरोबर सुंदर डान्स स्टेप करताना दिसत आहे.

Tauba Tauba Dance Reel
तौबा तौबा डान्स रिल (विकी कौशल (ANI and Rupali INSTAGRAM))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 24, 2024, 2:53 PM IST

मुंबई - Tauba Tauba Dance Reel : बॉक्स ऑफिसवर नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'बॅड न्यूज' हा सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील 'तौबा-तौबा' या गाण्याला यूट्यूबवर 100 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहे. या गाण्यावर देश आणि विदेशात अनेक रील्स तयार केले जात आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका गावातील महिलेनं आपल्या मुलांबरोबर या गाण्यावर रील बनवला आहे. हा रील तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या रीलला 58 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हे समजल्यानंतर विकी कौशलच्या तोंडून वाह वा... निघाली आहे. 'तौबा तौबा'वर रोज नवनवीन रील्स येत आहेत. आता हे रील अनेकांना आवडत आहे.

'तौबा-तौबा' गाणं हिट : या गाण्यातील विकी कौशलच्या डान्स हा अनेकांना आवडला आहे. विकी कौशलनं बीटीएसमधील जुंगकुकच्या डान्स स्टेप करून आता चांगलीचं प्रसिद्ध मिळवली आहे. बॉलिवूडमध्ये अनेक कोरियोग्राफर बीटीएसला फॉलो करतात आणि त्याच्याप्रमाणे डान्स स्टेप अभिनेत्यांना करायला लावतात. त्याचबरोबर या गाण्यातील विकीच्या डान्सनं लोक इतके वेडे झाले आहेत की, अनेकजण रील बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रुपाली सिंग नावाच्या महिलानं 'तौबा-तौबा'वर सुंदर डान्स केला आहे. रुपालीनं साडी नेसून तिच्या घरासमोर आपल्या दोन मुलांसह डान्स केला. यानंतर मागून रुपालीचा नवरा सायकलवर येतो आणि तिच्याकडे बघू लागतो. रुपालीची शुद्ध देसी शैली सोशल मीडिया यूजर्सला आवडली आहे.

विकी कौशल : विकी कौशलनं देखील हा डान्स व्हिडिओ पाहिला आहे. 'तौबा-तौबा' गाण्याचं कोरिओग्राफर, बॉस्को मार्टिस यांनी या व्हिडिओवर हार्ट इमोजी देखील शेअर केले आहेत. आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपनं महिलेच्या डान्सवर रेड हार्ट इमोजी शेअर केले आहे. 'तौबा-तौबा' हे गाणं गायक करण औजलानं गायलं आहे. या गाण्याला 100 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा चित्रपट 19 जुलै रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं पाच दिवसांत 30 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details