महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'बॉर्डर 2'मध्ये सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीची एन्ट्री, सनी देओलसह करणार शत्रूशी मुकाबला - SUNIL SHETTY SON AHAN SHETTY - SUNIL SHETTY SON AHAN SHETTY

SUNIL SHETTY SON AHAN SHETTY : बॉलिवूड स्टार सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी याने 'बॉर्डर 2' चित्रपटात एन्ट्री केली आहे. यापूर्वी सुनील शेट्टीनं 'बॉर्डर' चित्रपटात एका शूर सैनिकाची भूमिका साकारली होती. आता बापाच्या पावलावर पाऊल टाकत अहान आपला पराक्रम पडद्यावर दाखवण्यासाठी सज्ज होणार आहे.

SUNIL SHETTY SON AHAN SHETTY
'बॉर्डर 2'मध्ये अहान शेट्टीची एन्ट्री (Ahan Shetty in Border 2 (Photo: Film poster/IANS))

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 3, 2024, 4:54 PM IST

मुंबई - सनी देओल, वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ यांच्यानंतर सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी 'बॉर्डर 2' या आगामी महत्वकांक्षी चित्रपटामध्ये दाखल झाला आहे. 'बॉर्डर' चित्रपटात सुनील शेट्टीने संस्मरणीय काम केले होते. या चित्रपटातील भूमिकेत तो शहीद झाल्याचं दिसलं होतं. आता, 'बॉर्डर 2' चित्रपटात सुनील शेट्टीची अनुपस्थिती भरून काढण्यासाठी, त्याचा मुलगा अहान याला स्टारकास्टमध्ये सामील करण्यात आलं आहे. सनी देओल आणि अहान शेट्टी यांनी आपापल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या चाहत्यांना याची माहिती दिली आहे. यानिमित्तानं एक टीझरही रिलीज करण्यात आला आहे.

'बॉर्डर २' मध्ये अहान शेट्टीचा प्रवेश

'बॉर्डर 2' चित्रपटाच्या टीझरमध्ये 'बॉर्डर' चित्रपटातील सुनील शेट्टीची झलक दाखवण्यात आली आहे. यामध्ये सुनील शेट्टी शत्रूंशी लढताना दिसत आहे. आता 'बॉर्डर २' मध्ये हेच काम त्याचा मुलगा अहान शेट्टीही करणार आहे. गेल्या जूनमध्ये या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. सनी देओल, वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ यांनी चित्रपटात एंट्री केली असून आता अहान शेट्टी या चित्रपटात एका भक्कम सैनिकाच्या भूमिकेत पडद्यावर दिसणार आहे.

चित्रपट कधी प्रदर्शित होणार?

'बॉर्डर 2' चित्रपटाची निर्मिती जेपी दत्ता, निधी दत्ता, भूषण कुमार आणि कृष्ण कुमार करत आहेत. अनुराग सिंग 'बॉर्डर २' चे दिग्दर्शन करत आहेत. 'बॉर्डर 2' या चित्रपटासाठी प्रेक्षकांना अजूनही बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण हा चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होईल. बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करणारा 'बॉर्डर' हा चित्रपट 13 जून 1997 रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन जेपी दत्ता यांनी केले होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील युद्धपटांच्या श्रेणीत सर्वाधिक हिट चित्रपटांच्या यादीत 'बॉर्डर' हा चित्रपट अव्वल ठरला आहे. आता 'बॉर्डर'ने जो धमाका त्याकाळी केला होता त्याची पुनरावर्ती याचा सीक्वेल करेल का हे आता पाहावं लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details