मुंबई - Shruti Haasan BREAK UP ? : साऊथ सिनेसृष्टीतील अभिनेत्री श्रुती हासन अचानक तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. एका रिपोर्ट्नुसार, श्रुती हासननं बॉयफ्रेंड शंतनु हजारिकाबरोबर ब्रेकअप केलं आहे. श्रुती आणि शंतनूच्या ब्रेकअपच्या बातम्या या सोशल मीडियावर प्रचंड वेगानं पसरत आहेत. याशिवाय दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्याचं आता बोललं जात आहे. अलीकडेच श्रुतीनं तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवर तिनं लिहिलं होतं, "हा एक विलक्षण प्रवास होता, मी माझ्याबद्दल आणि इतर लोकांबद्दल खूप काही जाणून घेतलं." आता या ब्रेकअपच्या बातमीवर श्रुती आणि शंतनू यांनी अद्यापही प्रतिक्रिया दिलेली नाही.
श्रुती हासन आणि शंतनु हजारिकाचं ब्रेकअप ? :श्रुती आणि शंतनू बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रेमी युगुल गेल्या 2 वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांना अनेकदा पार्ट्या, व्हेकेशन आणि मुंबईत स्पॉट केलं गेलं आहे. दरम्यान शंतनूबद्दल सांगायचं झालं तर तो एक प्रसिद्ध डूडल आणि व्हिज्युअल आर्टिस्ट आहे. रफ्तार, दिव्य आणि ऋत्विज यांसारख्या अनेक सेलिब्रिटींबरोबर त्यानं काम केलं आहे. त्याचे इंस्टाग्रामवर 1 लाख 24 हजार फॉलोअर्स आहेत. याआधी सोशल मीडिया स्टार ओरी उर्फ ओरहान अवत्रामानी यानं दोघांच्या लग्न झाल्याची अफवा पसरवली होती, त्यानंतर श्रुतीनं या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. तिनं लग्न केलं नसल्याचं स्पष्ट केलं होतं.