महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

श्रद्धा कपूरनं वडील शक्ती कपूर यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पोस्ट व्हायरल - Shakti Kapoor - SHAKTI KAPOOR

Shraddha Kapoor Wishes Her Father: शक्ती कपूर यांचा आज 72 वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं श्रद्धा कपूरनं वडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Shraddha Kapoor Wishes Her Father
श्रद्धा कपूरनं तिच्या वडिलांना दिल्या शुभेच्छा (शक्ति कपूर बर्थडे (IANS/ANI))

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2024, 5:44 PM IST

मुंबई - Shakti kapoor Birthday :बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूर त्यांचा आज 3 सप्टेंबर रोजी 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या विशेष प्रसंगी श्रद्धा कपूरनं तिच्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा या सोशल मीडियाच्या माध्यामातून दिल्या आहेत. श्रद्धानं वडील शक्ती कपूर यांच्याबरोबरचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. आता या फोटोच्या पोस्टवर चाहते आणि स्टार्स कमेंट्स करत आहेत. वडील शक्ती कपूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना श्रद्धा कपूरनं कॅप्शनमध्ये लिहिलं," हॅपी बर्थडे बापू, आज माझ्या आवडत्या पुरुषाचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बापू, ती एक स्त्री आहे, ती काहीही करू शकते, कारण तिच्या वडिलांचा हात सदैव तिच्यावर असतो, लव्ह यू बापू."

चाहत्यांनी केल्या भरभरून कमेंट्स : श्रद्धाच्या या पोस्टवर अनेक स्टार्स आणि चाहत्यांनी कमेंट्स करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. कमेंट विभागात, श्रद्धाचा सह-कलाकार वरुण धवननं लिहिलं, 'शक्सस्स ... लुकिंग फ्रेश." अभिनेत्री करिश्मा कपूरनं लिहिलं, "वाढदिवसाच्या शुभेच्छा शक्ती सर." यानंतर जॅकी श्रॉफनं कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं, "सर हॅपी बर्थडे." याशिवाय एका चाहत्यानंही शक्ती कपूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहिलं, "वाढदिवसाच्या शुभेच्छा शक्ती आऊ सर. दुसऱ्या एकानं लिहिलं, "शक्ती सर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा."

'स्त्री 2'ची जगभरातील कमाई :सध्या श्रद्धा कपूर तिच्या 'स्त्री 2' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी यांसारख्या कलाकारांच्या या चित्रपटात विशेष भूमिका आहेत. हा चित्रपट 15 ऑगस्टला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार, वरुण धवन आणि तमन्ना भाटिया यांनीही चित्रपटात कॅमिओ केला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केलं आहे. सध्या हा चित्रपट रुपेरी पडद्यावर जोरदार कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटानं आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर जगभरात 700 कोटीहून अधिकचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी आता देखील चित्रपटगृहांमध्ये गर्दी होताना दिसत आहे.

हेही वाचा :

  1. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2' देशांतर्गत 500 कोटीच्या क्लबमध्ये सामील - 500cr club movie STREE 2
  2. श्रद्धा कपूर आता हृतिक रोशनच्या घरची भाडेकरु , 'खिलाडी' आणि 'स्त्री' नवे शेजारी - shraddhas neighbour akshay kumar
  3. श्रद्धा कपूर स्टारर 'स्त्री 2'नं 12 दिवसात जगभरात 500 कोटीची केली 'कमाई' - STREE 2close to 600 cr at worldwide

ABOUT THE AUTHOR

...view details