मुंबई - Valentine's Day 2024 :आज 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन्स डे'निमित्त अनेकजण पोस्ट शेअर करून आपल्या प्रेमाला शुभेच्छा देताना दिसत आहेत. या दिवशी काही प्रेमवीर आपल्या जोडीदाराला काही गिफ्ट देऊन आनंदी करतात. दरम्यान हिंदी आणि साऊथ चित्रपटसृष्टीतील स्टार्सही आपल्या जोडीरादाला 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या विशेष प्रसंगी शुभेच्छा देत आहेत. शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रा आणि मुलांसोबत 'व्हॅलेंटाईन्स डे' साजरा करण्यासाठी देशाबाहेर गेली आहे. तसेच दिशा पटानीलाही तिचा व्हॅलेंटाइन मिळाला आहे. याशिवाय बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हरसह अनेक सेलिब्रिटी व्हॅलेंटाईन डे एन्जॉय करत आहेत.
शिल्पा शेट्टी :शिल्पा शेट्टीला पती राज कुंद्रानं 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या शुभेच्छा दिल्या आहेत. राजनं पत्नीच्या नावानं एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. याशिवाय या पोस्टमध्ये एक व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये राज आणि शिल्पाचे रोमँटिक फोटो आहे. शिल्पानं देखील आपल्या पतीबरोबर सुंदर फोटो शेअर केले आहेत.
दिशा पटानी : 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या दिवशी दिशा पटानीला गुलाबांनी भरलेला पुष्पगुच्छ मिळाला. दिशानं काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती हॉट दिसत आहे. याशिवाय तिनं तिच्या फोटोसोबत लाल हार्ट इमोजी देखील पोस्ट केला आहे.