ETV Bharat / entertainment

'कल्की 2898 एडी'चे हक्क 'या' दोन आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मनं घेतले विकत? - Kalki 2898 OTT Release and Right

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 26, 2024, 5:55 PM IST

Kalki 2898 OTT Release and Rights : 'कल्की 2898 एडी' हक्क अमेजन प्राईम आणि नेटफ्लिक्सनं विकत घेतल्याचं समजत आहे. या चित्रपटाचा पहिला शो उद्या सकाळी 1.30 मिनिटांनी असेल.

Kalki 2898 OTT Release and Rights
कल्की 2898 एडी ओटीटी रिलीज हक्क (कल्की 2898 एडी (IMAGE- ETV BHARAT))

मुंबई - Kalki 2898 OTT Release and Rights : साऊथ सिनेसृष्टीतील स्टार प्रभास अभिनीत 'कल्की 2898 एडी' उद्या 27 जून रोजी जगभरातील बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज आहे. प्रभासचे चाहते या चित्रपटाच्या रिलीजची वाट अनेक दिवसांपासून पाहात होते. आता अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'कल्की 2898 एडी'नं भारत आणि परदेशात आगाऊ बुकिंग करून करोडो रुपयांचा गल्ला जमा केला आहे. 'कल्की 2898 एडी'नं आगाऊ बुकिंगमध्ये रेकॉर्डब्रेक तिकिटे विकत आहेत. दरम्यान उत्तर अमेरिकेत, 'कल्की 2898 एडी'नं आगाऊ बुकिंगच्या प्री-सेल्समध्ये 3 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे. दरम्यान 'कल्की 2898 एडी'चे ओटीटी हक्क विकले गेले असल्याचं समजत आहे.

'कल्की 2898 एडी'चं ओटीटी हक्क : रिपोर्ट्सनुसार, 'कल्की 2898 एडी'चे ओटीटी हक्क दोन आघाडीचे प्लॅटफॉर्म अमेजन प्राईम आणि नेटफ्लिक्सनं विकत घेतले आहेत. नेटफ्लिक्सनं हिंदी व्हर्जनचे राइट्स 175 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. तसेच दुसरीकडे ॲमेझॉन प्राईमनं 200 कोटी रुपयांना साऊथमधील भाषांचे राइट्स विकत घेतले आहेत. मात्र निर्मात्यांनी या बातमीला दुजोरा दिलेला नाही. 600 कोटी रुपयांच्या प्रचंड बजेटमध्ये बनवलेल्या 'कल्की 2898 एडी'नं ओटीटी हक्कांमधून एकूण 375 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाची आतापर्यत ओटीटी रिलीजची तारीख जाहीर झालेली नाही.

'कल्की 2898 एडी' होईल 'या' भाषांमध्ये रिलीज : चित्रपट ओटीटीवर 8 आठवड्यांनंतर म्हणजेच थिएटरमध्ये रिलीज झाल्याच्या 2 महिन्यांनंतर प्रदर्शित केला जाईल. 'कल्की 2898 एडी' रिलीजला काही तासही उरलेले आहेत. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केलंय. अमिताभ बच्चन, कमल हासन, प्रभास, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवशी 100 कोटीची कमाई करू शकतो, अशी अपेक्षा चाहते करत आहेत.

हेही वाचा :

  1. राहुल गांधी यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल थलपती विजयनं केलं अभिनंदन - Vijay congratulated Rahul Gandhi
  2. 'बेबी जॉन'ची रिलीज डेट ठरली, वरुण धवनचा चित्रपट देणार 3 चित्रपटांशी टक्कर - Baby John release date confirmed
  3. 'कल्की 2898 एडी'मधून 'सुप्रीम यास्किन'च्या रूपात कमल हासनचं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज - Kamal Haasan first look poster

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.