ETV Bharat / entertainment

'बेबी जॉन'ची रिलीज डेट ठरली, वरुण धवनचा चित्रपट देणार 3 चित्रपटांशी टक्कर - Baby John release date confirmed - BABY JOHN RELEASE DATE CONFIRMED

Baby John release date confirmed : वरुण धवनची मुख्य भूमिका असलेला 'बेबी जॉन' या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. वरुण धवनचा 'बेबी जॉन' बॉक्स ऑफिसवर तीन चित्रपटांशी टक्कर देणार आहे.

Baby John release date confirmed
'बेबी जॉन'ची रिलीज डेट ठरली (Baby John poster)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 26, 2024, 4:54 PM IST

मुंबई - Baby John release date confirmed : वरुण धवन स्टारर ॲक्शन ड्रामा चित्रपट 'बेबी जॉन'ची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'बेबी जॉन' या चित्रपटाची रिलीज डेट आज 26 जून जाहीर करण्यात आली आहे. ॲटली वरुण धवन, कीर्ती सुरेश, जॅकी श्रॉफ आणि राजपाल यादव स्टारर चित्रपट 'बेबी जॉन'चे निर्माते आहेत. ॲटलीने शाहरुख खानसोबत 'जवान' हा चित्रपट केला होता. 'जवान' गेल्या वर्षी 2023 मध्ये रिलीज झाला होता. 'जवान'ने जगभरात बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. एटली आणि वरुण धवनचा 'बेबी जॉन' चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे ते जाणून घेऊया.

'बेबी जॉन'ची कथा कलिश यांनी लिहिली आणि दिग्दर्शित केली आहे. 'बेबी जॉन' हा ऍटली दिग्दर्शित 'थेरी' चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. 'थेरी' 2016 मध्ये रिलीज झाला होता, ज्यामध्ये दक्षिण सुपरस्टार विजय आणि सामंथा रुथ प्रभू यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

चित्रपट कधी प्रदर्शित होणार? - 'बेबी जॉन'च्या निर्मात्यांनी चित्रपटातील वरुण धवनचे एक जबरदस्त पोस्टर शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. 'बेबी जॉन' 25 डिसेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटात वरुण धवनबरोबर अभिनेत्री वामिका गब्बी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

कोणत्या चित्रपटांशी स्पर्धा असेल? - डिसेंबर 2024 मध्ये केवळ वरुण धवनचा 'बेबी जॉन'च नाही तर अक्षय कुमारचा कॉमेडी चित्रपट 'वेलकम 3', आमिर खानचा 'सितारे जमीन पर' आणि 'मुफासा' 20 डिसेंबरला रिलीज होणार आहेत. आता या तिन्ही चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित होणार असल्यामुळं २५ डिसेंबरला प्रेक्षक 'बेबी जॉन'ला पाहायला येतात की नाही हे पाहायचे आहे.

अलिकडेच पिता बनलेलेल्या वरुण धवनची वर्कफ्रंट - वरुण धवन आणि नताशा हे जोडपं अलिकडेच आई बाबा झाले आहेत. त्यांच्या घरी 3 जूनला एका चिमुकल्या परीचं आगमन झालंय. त्यानंतर वरुणनं इंस्टाग्रामवर एक क्यूट व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओ पोस्टवर त्यानं असं लिहिलं होत की, "बेबी धवन प्राउड पॅरेंट्स आणि वरुण, प्राउड फैमिली." या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं होत की, 'आमची मुलगी आली आहे' शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे कृष्ण." या पोस्टवर बॉलिवूडमधील स्टार्सनं कमेंट्स करून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान वरुणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'बेबी जॉन' या चित्रपटाव्यतिरिक्त 'स्त्री 2' , 'एक्कीस' आणि 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा -

  1. वरुण धवननं 'फादर्स डे'वर मुलीची पहिली झलक केली शेअर, पाहा फोटो - varun dhawan
  2. झहीर इक्बालनं पत्नी सोनाक्षी सिन्हाला गिफ्ट केली बीएमडब्लू आय 7 कार - Zaheer Iqbal and Sonakshi Sinha
  3. 'इंडियन 2' मधून परतलेल्या सेनापतीचं नेटिझन्सकडून जोरदार स्वागत, ट्रेलरनं देशभर निर्माण केली हवा - Indian 2 Trailer

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.